बेळगाव : कागवाडात महिलेचा संशयास्पद मृत्यू;

बेळगाव : कागवाडात महिलेचा संशयास्पद मृत्यू;

belgavkar.com | belgaum | belgavkar

शरीरावर जखमा असल्याने खूनाची शक्यता.

बेळगाव : अथनी तालुक्यातील केंपवाड गावात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू शेतात आढळून आलायं. कागवाड भागातील केंपवाड येथे महिलेची हत्या करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नवनिहाळ गावची पूजा मानिंग बेलुब्बी (वय 32, कागवाड) असे मृत महिलेचे नाव आहे.
सोमवारी (19 एप्रिल) सकाळी ग्रामस्थांना महिलेचा मृतदेह आढळून आला. अज्ञातांनी मारहाण करत महिलेची हत्या केल्याची शक्यता आहे. मृतदेहाच्या चेहर्‍यावर चाकूने वार केल्याची गंभीर जखम आहे आणि हल्लेखोरांनी महिलेचा खून केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली आहे. हल्लेखोरांवर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कागवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
जमखंडी तालुक्यातील आडीउडी ही महिलेची सासरवाडी आहे. पतीने तिला घटस्फोट दिल्याने ती सध्या आपल्या माहेरी नवनिहाळमध्ये राहात होती. सोमवारी सकाळी 7 वा. तिचा मृतदेह केपवाड गावच्या हद्दीत एका शेतामध्ये आढळून आला. तिच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत. घटनास्थळी कागवाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत धर्मट्टी पाहणी केली. पोलिसांनी तात्काळ हालचाली करून सातजणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले हे मोळे आणि केंपावाडमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कागवाडात महिलेचा संशयास्पद मृत्यू;
शरीरावर जखमा असल्याने खूनाची शक्यता.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm