बेळगाव : येळ्ळूरच्या माजी ग्रा. पं. सदस्यावर प्राणघातक हल्ला

बेळगाव : येळ्ळूरच्या माजी ग्रा. पं. सदस्यावर प्राणघातक हल्ला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : झालेल्या पार्टीत दारूच्या नशेत तिघांनी येळ्ळूरच्या (ता. बेळगाव) माजी ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला केला. क्षुल्लक कारणावरून येळ्ळूरच्या माजी ग्रा. पं. सदस्याला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी (18 एप्रिल) रात्री ही घटना घडली होती. मुकुंद घाडी ( वय 42, रा. परमेश्वरनगर) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
त्यांची पत्नी भारती घाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुनील कुंडेकर, नागराज मजुकर, अनूज कुगजी ( सर्व रा. मारुती गल्ली, येळ्ळूर ) या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री वरील तिघांनी माजी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद घाडी यांच्याबरोबर वाद काढून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळे त्यांनी जाब विचारताच तिघांनीही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी जखमी मुकुंद यांची पत्नी भारती यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत. जखमी मुकुंद याची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : येळ्ळूरच्या माजी ग्रा. पं. सदस्यावर प्राणघातक हल्ला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm