बेळगाव : महिलेची हातचलाखी, दागिने लांबविले; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बेळगाव : महिलेची हातचलाखी, दागिने लांबविले;
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. हुक्केरी : येथील नवीन बसस्थानक शेजारील सराफी दुकानात एक तरुण व दोन महिलांनी हातचलाखी करत 7 ग्रॅमचे सोन्याचे दागिने लांबविले. मौनेश पोतदार यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी झाली होती. ही संधी साधत एक तरुण व दोन महिला त्यांच्या दुकानात शिरल्या. सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका महिलेने 7 ग्रॅमचे सोन्याचे दागिने लांबवले.
रात्री दुकान बंद करताना मौनेश यांनी दागिने तपासताना 7 ग्रॅमचा दागिना कमी आढळून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. मौनेश यांनी हुक्केरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सदर महिलेचा चेहरा स्पष्ट दिसून आल्याने पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली देऊन दागिने परत करण्याचे आश्वासन दिल्याचे मौनेश पोतदार यांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : महिलेची हातचलाखी, दागिने लांबविले; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm