बेळगाव : नवा ट्रक चोरी आणि चालकाचे अपहरण; तिघा भावांना अटक

बेळगाव : नवा ट्रक चोरी आणि चालकाचे अपहरण;
तिघा भावांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत आप्पाचीवाडी फाटा येथे बुधवारी 7 ते 8 टोळीने ट्रकमालकास धाक दाखवून, बेदम मारहाण करून ट्रक पळवला. रमेश प्रल्हाद पोवार (रा. खटाव, जिल्हा सातारा) असे ट्रकमालकाचे नाव आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी फाटा येथे 8 एप्रिल रोजी ट्रकचालकाच्या डोळ्यात चटणीपूड फेकून वाहन लंपास करुन चालकाचे अपहरण करणार्‍या आंतरराज्य दरोडेखोर टोळीतील तिघांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ट्रक, वाहन, रोख रक्कम असा 17 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्‍त केला. यातील 5 जण फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सीपीआय संतोष सत्यनायक यांनी दिली.
मुत्तू उमलू राठोड (वय 38), युवराज उमलू राठोड (वय 30), सुरेश उमलू राठोड (वय 34, रा. कुमटगी तांडा, जिल्हा विजापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. केवळ 12 दिवसात या प्रकरणाचा छडा लावल्याने जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी निपाणी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. रमेश पोवार यांनी बळ्ळारी येथून एका फायनान्स कंपनीने केलेल्या लिलावातून 16 चाकी मालवाहू ट्रक 18 लाख रुपयांना खरेदी केला होता. तो ट्रक मालकाच्या मूळ गावी ते घेऊन जात होते. ट्रक चालक रमेश पोवार याने 8 एप्रिल रोजी सकाळी आप्पाचीवाडी फाटा येथे सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवून चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेला असता पांढर्‍या रंगाच्या वाहनामधून आलेल्या 8 जणांनी पोवारच्या तोंडावर चटणीपूड फेकून त्याला ट्रकसह विजापूर येथे नेले होते.
चालकाने 9 रोजी त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत ट्रक मालक सुपेकर यांनाी माहिती दिली. याबाबत चालकाने 13 एप्रिल रोजी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे उपअधीक्षक मनोजकुमार नायक, सीपीआय संतोष सत्यनायक, ग्रामीणचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पोवार यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला होता. सीपीआय संतोष सत्यनायक, ग्रामीणचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, शहरचे अनिलकुमार कुंभार यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. तोळगी आदींनी शिताफीने या प्रकरणाचा तपास लावला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : नवा ट्रक चोरी आणि चालकाचे अपहरण; तिघा भावांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm