बेळगाव : अल्पवयीन युवतीचे सांबरा येथून अपहरण

बेळगाव : अल्पवयीन युवतीचे सांबरा येथून अपहरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सांबरा येथून अल्पवयीन युवतीचे अपहरण झाल्याची नोंद मारीहाळ पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी मुजम्मील शेखइब्राहिम बारूदवाले (वय 32, रा. बाळेकुंद्री खुर्द, ता. बेळगाव) याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर युवती मागासवर्गीय असल्याने संबंधिताविरोधात अपहरणाबरोबरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.
मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, घरकामासाठी जात असताना आपल्या मुलीची मुजम्मील याच्याशी ओळख झाली होती. यातूनच त्याने सोमवारी आपल्या मुलीचे अपहरण केले आहे. तिचे वय 17 वर्षे 9 महिने असल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. मारीहाळ पोलिसांत नोंद झाली असून, निरीक्षक बी. एस. मंटूर तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अल्पवयीन युवतीचे सांबरा येथून अपहरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm