आमदार वसंत असनोटीकरांची हत्या करणाऱ्याला जन्मठेप
आमदार वसंत असनोटीकर

आमदार वसंत असनोटीकरांची हत्या करणाऱ्याला जन्मठेप

belgavkar.com | belgaum | belgavkar

उत्तर कन्नड : कारवारचे आमदार वसंत असनोटीकर यांची गोळ्या झाडून हत्या करणारा शार्प शूटर संजय मोहितेला जन्मठेप आणि 68 हजार रुपये दंड अशी शिक्षा येथील पहिल्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मंगळवारी जाहीर केली. 19 फेब्रुवारी 2000 रोजी कारवार शहरातील दैवज्ञ भवनासमोर आपल्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारीची पाहणी करण्यासाठीत गेलेल्या आमदार असनोटीकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणातील इतर संशयित दिलीप नायकची 2004 मध्ये हत्या झाली होती. उर्वरित संशयित अन्थोनी आणि बाबू या दोघांचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या प्रकरणाचा तपास करुन गुन्हे विभागाने (सीआयडी) आरोपपत्र दाखल केले होते. यावर सुनावणी करून न्यायाधीश शांतवीर शिवप्पा यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. वकील सुनंदा मडिवाळर यांनी सरकारची बाजू मांडली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आमदार वसंत असनोटीकरांची हत्या करणाऱ्याला जन्मठेप

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm