नाशिक : ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू video Coronavirus

नाशिक : ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू video Coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

नाशिक : महाराष्ट्र राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain Hospital) ऑक्सिजनची गळती (Oxygen Tank Leak) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला.
रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.
राजेश टोपे काय म्हणाले?
नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. या टँकरमधील व्हॉल लीक झाल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे स्थानिक प्रशासनाने कळवल आहे, असेही ते म्हणाले. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
30 ते 35 जण दगावल्याचा सुधाकर बडगुजर यांचा दावा : मी स्वत: या रुग्णालयात आत जाऊन सर्व बेड चेक केले. यात 61 रुग्ण हे गंभीर आहेत. तर 30 ते 35 जण दगावल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दीड तासापासून ते ऑक्सिजनसाठी तडफडत होते. पण त्यांना ऑक्सिजन न मिळाल्याने ते मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. ज्या एजन्सी ऑक्सिजन प्लांट बसवला असेल, त्यांनी या ठिकाणी टेक्निकल टीम ठेवणं गरजेचे होतं. ऑक्जिन प्लांट हे डॉक्टर बघत नाहीत. ते टेक्निकल काम असतं. मात्र त्यांनी टेक्निकल टीम या ठिकाणी का ठेवली नाही? असा सवालही सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, सुधाकर बडगुजर यांची मागणी : अनेक नातेवाईक आत रडत होते, आम्हाला ऑक्सिजन मिळवून द्या. राज्य सरकारने 11 लोक हे प्राथमिक स्वरुपात सांगितले आहे. पण मी दोन वॉर्डात जाऊन पेशंट बघितले त्यातील निम्म्या रुग्णांचा मृत्यू झाला असावा. जर टेक्निकल टीम ठेवली असती तर दुर्घटना झाली नसती. त्यामुळे हलगर्जीपणा करण्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही सुधाकर बडगुजर यांनी केली.
दोषींवर कायदेशीर कारवाई : या दुर्घटनेत 22 जण दगावल्याची माहिती मिळत आहेत. एकूण 300 जण उपचार घेत होते. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल. जो कोणी दोषी असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. सध्या तरी हलवले जाणार नाही, रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरु झाला आहे, अशी माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

नाशिक : ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू video Coronavirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm