बेळगाव : एपीएमसी भाजी मार्केट बंद राहणार; विकेंड कर्फ्यू

बेळगाव : एपीएमसी भाजी मार्केट बंद राहणार;
विकेंड कर्फ्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कर्नाटक राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊन नसला, तरी विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत कडकडीत Curfew असणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC एपीएमसी) बाजारपेठ असलेल्या कंग्राळी एपीएमसी मार्केट नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार भाजी विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. Weekend Curfew मुळे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी भाजी विक्री बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी दिली आहे.
एपीएमसी मार्केटला सद्या कोरोनोची धास्ती लागली आहे. बेळगावमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत रोजच शेकड्याने भर पडत आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन 4 मेपर्यंत शनिवार आणि रविवार हे सलग दोन दिवस एपीएमसी होलसेल भाजी मार्केट बंद राहणार आहे. एपीएमसीच्या मार्केटमध्ये रोज लोकांची होणारी आवक जावक कमी करण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत. तसेच एपीएमसी मधील गर्दी कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिबंधक उपाय करण्यासाठी दोन दिवस एपीएमसी बंद ठेवण्यात येणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : एपीएमसी भाजी मार्केट बंद राहणार; विकेंड कर्फ्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm