बेळगाव : रामनवमी उत्साहात साजरी; धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठा

बेळगाव : रामनवमी उत्साहात साजरी;
धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 'राम जन्मला गं सखी राम जन्मला', गीत रामायणातल्या या ओळी ऐकल्या की एक वेगळीच स्फुर्ती येते. भगवान श्रीरामांचं वर्णन करणाऱ्या या गीतामध्ये अनेक गोष्टी दडल्या आहेत. आज (21 एप्रिल) रामनवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म दिवस. आजच्याच दिवशी दुसऱ्या प्रहराला श्रीरामचंद्रांचा जन्म झाला आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. विशेष म्हणजे अजूनही देशातील अनेक राज्यांमध्ये रामनवमी मोठ्या दणक्यात साजरी केली जाते. अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत रामनवमी साजरी करण्यात आली. शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विभाग प्रमुख गीता वर्पे, आशा कुलकर्णी, सुजाता पाटील, विणाश्री चंद्रकांत तुर्केवाडी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
देशासह राज्यसभरात आज रामनवमी साजरी केली जात आहे. सलग दुसऱ्या वर्षी रामनवमीचा उत्सव भक्तांविना पार पडत आहे. देशासह राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवनातून जगण्याचा आदर्श निर्माण केला. धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठेचं महत्व दाखवून दिलं. प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. श्रीरामभक्ती आणि श्रीरामकथा देशवासियांसाठी जगण्याची ताकद आहे. श्रीराम भक्तीच्या सांस्कृतिक धाग्यानं आपण सारे जोडले गेलो आहोत. श्रीराम भक्तीचं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव जपत असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या, लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया. श्रीराम नवमीनिमित्त प्रभू श्रीरामांना भावपूर्ण वंदन. श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत उपमुख्याध्यापिका ऋतुजा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 
याप्रसंगी शिक्षिका सुनिता मराठे, माधवी पालकर, सविता पाटणकर, माणिक उपाध्ये, प्रेमा मेलींनमनी, शामल दड्डीकर, विनीता देशपांडे, मीनाक्षी जाधव, सुप्रिया चाळके, श्रद्धा मेंडके, सीमा कामत, धनश्री पाटील, सुप्रिया पाटील, राजश्री कडोलकर, नीला धाकलूचे, रूपाली जोशी, सरोजा कटगेरी, विना जोशी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, लक्ष्मी पेडणेकर, सुजाता होळकर, सुनिता पाटील, रेणुका काळे, प्रिया जाधव, अश्विन लोहार, ज्योती तेवरे, रेखा मलतवाडी, भारती बाळेकुंद्री, रूपा तुपन्नावर, रेणुका शहापूरकर व आदी उपस्थित होते.
Photo : रामनवमीनिमित्त श्रीरामाच्या फोटो पूजन प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव गीता वर्पेसह शालेय शिक्षक वर्ग

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : रामनवमी उत्साहात साजरी; धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm