news.jpg | बेळगावात 'कडक निर्बंध'ला सुरुवात; बाजारपेठेतील ती दुकानं अचानक बंद; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावात 'कडक निर्बंध'ला सुरुवात; बाजारपेठेतील ती दुकानं अचानक बंद;

belgavkar.com | belgaum | belgavkar

दिवसाही एकप्रकारचा 'मिनी लॉकडाउन' CoronaVirus काय बंद राहणार?

5 मे पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित आस्थापने सुरू राहणार | अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय व दुकान बंद | बांधकामांशी संबंधित सर्व कामे व आस्थापने सुरू असणार

बेळगाव : कर्नाटक राज्यात नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार शनिवार व रविवार पूर्ण कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मात्र, आज गुरुवारी दुपारी 1 वाजल्यापासूनच अचानक 'कडक निर्बंध' बेळगाव बाजारपेठेत लावण्यात आले आहेत. रामदेव गल्ली, गणपत गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, कडोलकर गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली व परिसरातील ती दुकानं अचानक बंद झाली आहेत. आता संपूर्ण कर्नाटकात दिवसाही फक्त अत्यावश्यक दुकानं चालु राहणार आहेत. 5 मेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी येडियुरप्पा सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून यामध्ये 21 एप्रिल ते 4 मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे 5 मेपासून सर्व व्यवहार सुरु होतील. कर्नाटक राज्यात नाईट कर्फ्यू व वीकेंड लॉकडाउन जाहीर केलेल्या राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत 'मिनी लॉकडाउन ' लागू केला आहे. या काळात शॉपिंग मॉल, व्यापारी आस्थापने, चित्रपटगृहे तसेच अन्य व्यापारी आस्थापने बंद ठेवली जाणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी याबाबतचा आदेश बजावला आहे. त्यामुळे गुरुवार 22 एप्रिलपासून सकाळी प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 5 मे सकाळी 6 पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
अचानक पोलिसांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले आहे. काेराेनाचे नियम पाळून आम्ही व्यवसाय सुरु ठेवणार आहे. सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा असे आवाहन व्यापार्‍यांनी केले आहे. आगामी काळात लग्न सराई आहे. नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी आम्ही दुकानं सुरु केली आहेत. कोणती दुकाने बंद राहणार आणि कोणती सुरू याबाबत संभ्रम राहिल्याने बाजारपेठेतील व्यवसायिकांनी दुकाने बंद करण्यात येत आहेत.

काय सुरु
अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित आस्थापने सुरू राहणार
हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सुविधा
बांधकामांशी संबंधित सर्व कामे व आस्थापने सुरू असणार
किराणा सामान, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व खाद्य दुकाने प्रकार.
हाॅस्टिटल आणि मेडिकल्स
प्रवासी वाहतूकिला 50% क्षमतेची मुभा असणार
बँक व सोसायटी (सकाळी 10 ते 2)
औद्योगिक कारखाने - औद्योगिक आस्थापने सुरू राहतील.
कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा
रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसियां, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा
विवाह समारंभाला फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
पेट्रोल पंप सुरु राहतील
जीवनावश्यक वस्तूची निर्मिती करणारे कारखाने
आपत्ती व्यवस्थापनाची कामे, सेवा
स्थानिक प्रशासनाच्या सर्व सार्वजनिक सेवा
काेराेना हा व्यापार्‍यांमुळे हाेताे हा समज सरकारचा झाला आहे. सरकारने बार, रेस्टाॅरंट, हाॅटेल आदी सुरु ठेवले आहे, मग दुकाने का बंद असा सवाल व्यापार्‍यांनी केला. नाईट कर्फ्यू आम्ही मान्य केले. आमचा त्याबाबत सरकारला पाठींबा आहे. परंतु सोमवार ते शुक्रवार 5 दिवस दिवस दुकान बंद ठेवणे आम्हांला मान्य नाही. हा निर्णय अन्यायकारक आहे. वर्षभर आमचे नुकसान झाले आता पुन्हा बंद करुन आमच्या जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रयत्न केला आहे.

हे राहणार बंद

शॉपिंग मॉल, सिनेमागृह, व्यापारी आस्थापने, चित्रपटगृहे, एंटरटेनमेंट पार्क, तसेच अन्य व्यापारी आस्थापने बंद
शाळा व महाविद्यालये तसेच शिक्षण संस्था बंद
थिएटर, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, योगा सेंटर आदी बंद
सर्व राजकीय, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमही या काळात बंद
कोणतेही सामाजिक राजकीय, खेळ यासारखे मोठे इव्हेंट करण्यास मनाई
सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी कायम
जीवनावश्यक सेवेत न येणारी सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर
बागा, समुद्रकिनारे, मैदाने
राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या काळात केवळ अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित आस्थापने सुरू राहणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे मिनी लॉकडाउन लागू असणार आहे. हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असेल. त्यावेळी प्रशासन व व्यावसायिकांत संघर्ष होण्याची शक्यता आहे. बांधकामांशी संबंधित सर्व कामे व आस्थापने सुरू असणार आहेत. सर्व औद्योगिक आस्थापने सुरू राहतील. पण, तेथे कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
राज्यात केवळ रात्री 9 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू होणार, शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन असणार, सोमवार ते शुक्रवार नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार, असा समज व्यापाऱ्यांना झाला होता. पण राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या काळात केवळ अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित आस्थापने सुरू राहणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे मिनी लॉकडाउन लागू असणार आहे.याकाळात सर्व शाळा व महाविद्यालये तसेच शिक्षण संस्था बंद असणार आहेत. थिएटर, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, योगा सेंटर आदी बंद राहतील. सर्व राजकीय, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमही या काळात बंद असणार आहेत. हॉटेल व रेस्टॉरंट सुरू असतील पण तेथे ग्राहकांना प्रवेश असणार नाही. तेथून केवळ पार्सल नेता येणार आहे.
हे राहणार बंद : शॉपिंग मॉल, व्यापारी आस्थापने शाळा व महाविद्यालये
व्यायामशाळा, जलतरण तलाव, योगा सेंटर
राजकीय, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम
Closed
Schools, Colleges, Coaching Centres, Training Centres
Movie theatre, shopping mall, gym, spa, swimming pool, sports complex, amusement park, hall, assembly hall
Public access to all kinds of religious places is prohibited, but there is no restriction on daily worship
Parcel service only for hotel, restaurant, liquor shop, bar and restaurant
Prohibited for social, political, sports, entertainment, educational, cultural, religious and other programs
Offer to serve only guests who are already staying at lodges
All shops except those of essential commodities and construction materials are all closed


Open
Permission for all types of construction and repair activities with Kovid safety regulations There is no restriction on pre-monsoon agriculture activities
All types of industries, organizations, manufacturing units can operate
It is mandatory for the staff to show the ID card obtained by the organization
Grocery Store & Grocery, Fruit Vegetable, Milk Booth, Fish & Meat, Livestock Shops
Wholesale Vegetable / Fruit / Flower Trade Permits should not be carried out in the premises or open areas only
Opportunities for Backbone, Insurance Office, ATM, Printing and Electronic Media, Stock Exchange Service Centres
Only 50 people are allowed for wedding ceremonies
At the funeral only 20 people are allowed
Free access to persons transport and freight within the state. No prerequisites are required Metro, bus, cab, auto traffic, total seating capacity is only 50%
Saturday and Sunday groceries, vegetable milk shops are open only from 6 am to 10 am