belgaum-police-meeting-ayodhya-supreme-court-case-.jpg | उद्या शाळा व काॅलेज सुट्टी; बेळगाव शहरात कलम 144 लागु; अयोध्या रामजन्मभूमी निकाल. | belgaum news | belgavkar बेळगावकर

उद्या शाळा व काॅलेज सुट्टी; बेळगाव शहरात कलम 144 लागु; अयोध्या रामजन्मभूमी निकाल.

belgavkar.com | belgaum | belgavkar

सर्वांनी सहकार्य करावे, शांतता राखण्याचे आवाहन : बेळगाव जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन व पोलीस आयुक्त लोकेश कुमार

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल येत्या काहीच दिवसात सर्वोच्च न्यायालय देणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीदिनापर्यंत म्हणजे 17 नोव्हेंबरपर्यंत न्यायालय या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता आहे. आज जिल्हा पंचायतीच्या सभागृहात जिल्हा प्रशासन आणि बेळगाव पोलीस खात्याची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी यांनी सर्वधर्मियांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
लॉ अँड ऑर्डर कायम रहावी, यासाठी सर्वांनी मदत करावी. कोणत्याही व्यक्तीने कायदा आपल्या हाती घेऊ नये. सर्वांनी सहकार्य करावे असे, पोलीस आयुक्त लोकेश कुमार म्हणाले.पोलिस खाते सज्ज असल्याचे सांगितले.
Supreme-Court-Ayodhya-Belgaum-Police.jpg | उद्या शाळा व काॅलेज सुट्टी; बेळगाव शहरात कलम 144 लागु; अयोध्या रामजन्मभूमी निकाल. | belgaum news | belgavkar बेळगावकर
एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य देखील व्हायला नको. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांतता कायम राखणे आवश्यक आहे. हिंदू व मुस्लीम समाजातील धार्मिक नेते व संघटनांकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या बैठकीला पोलिस आयुक्त लोकेशकुमार, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगुडी, धार्मिक संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्या शाळा व काॅलेज सुट्टी; बेळगाव शहरात कलम 144 लागू : बेळगांव पोलीस आयुक्त बीएस लोकेश कुमार

  • शाळा-कॉलेज शनिवारी सुट्टी : एस. सुरेशकुमार प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री कर्नाटक

  • बेळगाव शहरात शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 144 कलमान्वये जमावबंदी लागू

  • मद्य विक्रीवरही बंदी : वाईन शॉप आणि बार बंद ठेवण्याचे आदेश
Belgaum Police Instructions to belgavkar बेळगाव पोलीसांनी बेळगावकरांना दिलेल्या सुचना.
नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे.
जमाव करून थांबू नये
सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत
निकालानंतर गुलाल उधळू नये
फटाके वाजवू नयेत
सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत
महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये
निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत
घोषणाबाजी जल्लोष करू नये
मिरवणुका रॅली काढू नये
भाषण बाजी करू नये
कोणतेही वाद्य वाजवू नये
धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये
कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ, फोटो, व्हॉट्स ऍप, फेसबुक वर फोटो पुन्हा प्रसारित करून कोणतीही अफवा पसरवू नये
जोक्स पाठवू नयेत
सदरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ जागेसंदर्भातील निकाल असेल.
तरी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या प्रत्येक हालचालीवर, whatsapp group वर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष्य आहे. नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास अगर कोणतीही अनुचित घटना होत असल्यास तत्काळ POLICE CONTROL ROOM संपर्क करावा.