‘एक ट्वीट की कीमत तुम क्या जानो...’
journalist-sucheta-dalal-trends-on-twitter-for-the-fall-of-adani-stocks-20210626

‘एक ट्वीट की कीमत तुम क्या जानो...’

belgavkar.com | belgaum | belgavkar

सुचेता दलाल यांच्या एका ट्वीटने अदानींच्या संपत्तीत लाखो कोटी रुपयांची घट, नेमकं काय घडलं?

जगातल्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे 14 व्या क्रमांकावर आहेत.

हर्षद मेहता प्रकरण उजेडात आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी केलेले एक ‘ट्वीट’ 12 जूनपासूनच समाज माध्यमात फिरत होते. ‘कुणीतरी जुनाच शेअर ऑपरेटर परदेशी गुंतवणूकदारांना हाताशी धरून एका उद्योग समूहाच्या शेअरचे भाव वाढवत आहे की काय?,’ असे कोणत्याही कंपनीचे नाव न घेता केलेले हे ‘ट्वीट’... पण त्यामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. ‘ट्वीट’च्या पाठोपाठ वृत्तपत्रांत बातमी आली, की अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी कंपन्यांचे डीमॅट खाते व निधी खाते ‘एनएसडीएल’ने गोठवले. पुढे अफवांची त्सुनामीच आली. बाजाराने त्याचा संबंध एकमेकांशी जोडून अदानी समूहाच्या शेअरची बेफाम विक्री केली व त्या समूहाच्या सर्वच शेअरना ‘लोअर सर्कीट’ लागले.
एकाच दिवसात अदानी ग्रुपचे शेअर्स 5 ते 20 टक्यांनी आपटले. अदानींना हा झटका सुचेता दलाल यांच्या एका ट्विटनं बसला. गेल्या वर्षभरापासून गौतम अदानी हे नाव सातत्यानं चर्चेत आहे. एका वर्षात अदानी ग्रुपचे शेअर्स इतक्या वेगानं वाढले की जगातल्या श्रीमंतांच्या यादीतही त्यांनी झपाट्यानं वरचं स्थान मिळवलं. मात्र आज शेअर बाजारात याच अदानींबद्दल एका बातमीनं संशयाचं वातावरण निर्माण केलंय. अदानी ग्रुपच्या बाजारातल्या आपटीनंतर दिवसभर सुचेता दलाल हे एक नावही चर्चेत राहिलं आहे. 2020 म्हणजे कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिथं सगळेजण आर्थिक नुकसानीचे आकडे मोजत होते. त्याच वर्षात या एका उद्योगपतींच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली. अदानी ग्रुपचे काही शेअर्स एका वर्षात दुप्पट ते दहापट वाढले होते. पण गेल्या वर्षभरात शेअर बाजारात जबरदस्ती मुसंडी मारणाऱ्या अदानी ग्रुपच्या शेअर्स आज भूकंप झाल्यासारखे हादरले. एकाच दिवसात अदानी ग्रुपचं भांडवली बाजारातलं मूल्य तब्बल 1 लाख 3 हजार कोटी रुपयांनी कमी झालं आणि याला कारण ठरली एक बातमी.
कोण आहे सुचेता दलाल? सुचेता दलाल या देशातल्या प्रसिद्ध बिझनेस पत्रकार आहेत. 1992 चा हर्षद मेहता घोटाळा, 2001 चा केतन पारेख घोटाळा याशिवाय एनरॉन प्रकल्पातल्या गैरव्यवहारालाही त्यांनी उजेडात आणलं होतं. त्यांच्या द स्कॅम या हर्षद मेहता घोटाळ्यावरच्या पुस्तकावर आधारित एक वेबसीरीजही नुकतीच तयार झाली होती.
दरम्यान, ‘एनएसडीएल’ने खुलासा केला, की कोणतेही खाते नव्याने गोठवलेले नाही. जी खाती गोठवली आहेत, ती तांत्रिक कारणांमुळे 2016 पासूनच गोठवलेली आहेत. मग, पुन्हा भाव वाढू लागले. पण सप्ताहाअंती अदानींची मालमत्ता कागदावर 1200 कोटी डॉलरने कमी झाली. मात्र, त्यात हात पोळले ते पळत्याच्या पाठीमागे लागलेल्या छोट्या गुंतवणूकदारांचे.
अदानी समूहातील शेअरचा विचार करता, अदानी एंटरप्रायझेस गेल्या वर्षभरात 900 टक्के, तर अदानी ट्रान्समिशन 700 टक्के आणि अदानी टोटल गॅस 1000 टक्क्यांनी वाढले. ही वाढ पचायला अविश्वसनीय व जडच होती. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात एनएसडीएलने अदानी ग्रुपमध्ये पैसे गुंतवलेल्या तीन विदेशी फर्मचे खाती गोठवल्याची बातमी समोर आली. अल्बुला इन्वेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्वेस्टमेंट फंड या तीन फर्ममधले तब्बल 43 हजार कोटी रुपयांचे शेअर्स गोठवण्यात आले. अदानी ग्रुपच्या शेअर्समधली गेल्या वर्षभरातली वाढ ही कृत्रिम आहे का याबाबतही सेबी तपास करण्याची शक्यता निर्माण झाली.
तब्बल 7500 कोटी डॉलरची मालमत्ता निर्माण केलेल्या या समूहाच्या शेअरचे विश्लेषक अत्यल्प आहेत. त्यामुळेच त्यांच्या खरेदी किंवा विक्रीची शिफारस कोणीही केलेली नाही. शेअरचे भाव जरी आकाशाला भिडलेले असले तरी त्यामागे मजबूत कामगिरी आहे. ‘अदानी ट्रान्समिशन’चा नफा 600 कोटी रुपयांवरून 1200 कोटींवर जाऊन येत्या वर्षात 4600 कोटींवर जाईल.- ‘अदानी पॉवर’ची विद्युतनिर्मिती 500 मेगावॉटवरून 3 गिगावॉटवर गेली आहे व पुढे 25 गिगावॉटचे लक्ष्य आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

‘एक ट्वीट की कीमत तुम क्या जानो...’
सुचेता दलाल यांच्या एका ट्वीटने अदानींच्या संपत्तीत लाखो कोटी रुपयांची घट, नेमकं काय घडलं?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm