harugeri-murder-love-belgaum-raibag-harugeri-village-murder-girl-202108.jpg | बेळगाव : एकतर्फी प्रेमातून 16 वर्षीय मुलीचा खून; हिंदू संघटनांचा तीव्र निषेध | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : एकतर्फी प्रेमातून 16 वर्षीय मुलीचा खून; हिंदू संघटनांचा तीव्र निषेध

belgavkar.com | belgaum | belgavkar

दहावीत शिकणार्‍या मुलीचा चाकूने सपासप वार करुन खून

दोघांचे घर हाकेच्या अंतरावर होते

बेळगाव ता. रायबाग : हारुगेरी येथे रविवारी एकतर्फी प्रेमातून युवकाच्या हल्ल्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली होती. उपचाराला नेताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी, रविवारी अल्पवयीन मुलगी दोन बहिणी व मैत्रिणीसह घराकडे जात होती.
हारुगेरी - तेरदाळ या रस्त्यावरील करणवाडी तोट येथून दुपारी दोनच्या सुमारास अमीर लालसाब (वय 20) जमादार याने दुचाकीवरून येऊन त्या मुलगीला 'मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्याशी का बोलत नाहीत' असे सांगत होता. मुलगीने स्पष्ट नकार देत पालकांना सांगण्याचा इशारा दिला. तेंव्हा अमीर याने सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर सहा ते सात वार केले. ती रक्तबंबाळ होऊन पडली. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेले. पुढील उपचारासाठी तातडीने गोकाक येथे नेताना तिचा मृत्यू झाला.
harugeri-murder-love-belgaum-raibag-harugeri-village-murder-girl-202108-girl.jpg | बेळगाव : एकतर्फी प्रेमातून 16 वर्षीय मुलीचा खून; हिंदू संघटनांचा तीव्र निषेध | belgaum news | belgavkar बेळगावकर
हारुगेरी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन सोमवारी न्यायालयात हजर करून कोठडीत रवानी केली. विविध हिंदू संघटनांनी या खूनाचा निषेध केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. खूनाला धार्मिक आणि लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. घटनेची फिर्याद हारुगेरी पोलिस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिली आहे. उपनिरीक्षक राघवेंद्र खोत, पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी यांच्यासह पोलिस तपास करत आहेत.