बेळगाव : प्रथम ऑनलाइन मैत्री, नंतर न्यूड व्हिडिओ कॉल... अशा फसवतात ठग युवती

belgavkar.com | belgaum | belgavkar

अशा फ्रेंड रिक्वेस्टपासून सावधान! जाळ्यात अडकवून करतायेत न्यूड व्हिडिओ चॅट आणि मग...

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आवाहन

बेळगाव : सोशल साइटवर अनोळखी युवती किंवा महिलेशी मैत्री करणे महागात पडू शकते. यात तुम्ही फसवले जाऊ शकता किंवा मग तुमची तुमचे मित्र आणि समाजात निंदा होऊ शकते. आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या ठग युवती सोशल साइट्सवर सध्या अँक्टीव्ह झाल्या आहेत. फसवणुकीचे शिकार बनवण्यासाठी या ठग युवती सोशल साइट्सवर मैत्री करतात. जे यांच्या जाळ्यात अडकतात त्यांना फसण्यात यांना जराही वेळ लागत नाही. सोशल मीडिया हाताळताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले.
चॅटदरम्यान करतात अश्लील गोष्टी : या तरुणी बराच काळ सर्वसामान्य चॅट करतात. त्यानंतर त्या अश्लील बोलणे सुरू करतात. जर समोरचा त्यांच्या जाळ्यात अडकला नाही, तर त्या त्याला ब्लॅकलिस्ट करतात. जो फसतो त्याला या युवती न्यूड व्हिडिओ कॉल करतात. या दरम्यान या युवती बोलणाऱ्याला देखील तसेच करायला सांगतात. जरी त्यांनी नाही केले तरी देखील त्या व्हिडिओ फेक असल्याचे सांगत पैशांची मागणी करतात.
स्क्रिन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ पाठवून करतात ब्लॅकमेल : व्हिडिओ कॉलमध्ये या ठग युवती स्क्रीन रेकॉर्डिंग करतात. रेकॉर्डिंगद्वारे मॉर्फड व्हिडिओ तयार करतात. यानंतर धमकी देत पैशांची मागणी करतात. हा पैसा विविध फेक ई-वॉलेटमध्ये ट्रान्स्फर केला जातो. सोशल मीडियावर देखील फेक अकाउंट तयार करूनच या ठग युवती बोलत असतात. याच कारणामुळे त्यांना अटक करणे देखील कठीण होऊन बसते.
WhatsApp, Facebook आणि Messenger वर येणार्‍या अनोळखींचे कॉलही घेऊ नयेत. जर अशा पद्धतीने कोणाची फसवणूक होत असेल तर संबंधितांनी भामट्यांच्या धमक्यांना भीक न घालता, त्यांना पैसे न देता सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव शहर व उपनगरांत असे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडले आहेत. त्यामुळेच बेळगावकरांनी सावध राहण्याचे आवाहनही डॉ. आमटे यांनी केले आहे.
असा सुरू होतो खेळ : अशाप्रकारे लोकांना जाळ्यात ओढणाऱ्यांचे एक मोठे रॅकेटच देशात कार्यरत आहे. या रॅकेटमधील लोक प्रथम फेसबुकवर एका सुंदर मुलीच्या फोटोसह एक आयडी तयार करतात. त्याची फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर खरा खेळ सुरू होतो. सुंदर मुलीचा फोटो पाहिल्यानंतर बहुतेक पुरूष फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. त्यानंतर हाय-हॅलो सुरू होते. काही वेळातच तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) नंबर विचारला जातो. तुम्ही नंबर दिलात की, व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा सुरू होतात. तुम्हाला सेक्समध्ये रस आहे का? असे प्रश्न विचारले जातात. अनेकजण या जाळ्यात अडकतात. त्यानंतर व्हिडिओ कॉलची (Video Call) कहाणी सुरू होते. ही टोळी संगणकाद्वारे एक अश्लील व्हिडिओ प्ले करते. यात एक न्यूड मुलगी अश्लील हालचाली करत चॅट सुरू करते. काही मिनिटांनंतर फोन कॉल बंद केला जातो आणि त्यानंतर एक फोन येतो ज्यावर तुम्ही आता एका मुलीबरोबर करत असलेल्या चॅटचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. आम्हाला पैसे द्या अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल केला जाईल, अशी धमकी देण्यात येते. बरेच लोक पैसे देतात आणि सुटका करून घेतात. अनेकजण या रॅकेटला बळी पडले आहेत.