Video 'हम शिवाजी महाराज की औलाद हैं..';
पाहा ‘भुज’चा दुसरा ट्रेलर, डायलॉगनी जिंकली प्रेक्षकांची मनं

belgavkar.com | belgaum | belgavkar


‘भुज : दी प्राइड ऑफ इंडिया’ या अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाच्या नव्या चित्रपटाचा (Bhuj : The pride of India) पहिला ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.
पहिल्या ट्रेलरप्रमाणेच याही ट्रेलरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून 13 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिषेक दुधैया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातली कथा दाखवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातले अधिकारी आणि देशाच्या नागरिकांनी मिळून केलेली एक दमदार कामगिरी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे, जी खरंच घडली होती यावर पटकन विश्वासही बसणार नाही.
पहिल्या ट्रेलरप्रमाणे दुसऱ्या ट्रेलरमध्येही अजय देवगणचे दमदार डायलॉग्ज पाहायला मिळतात. यातला एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. “हम उस महा छत्रपती शिवाजी की औलाद हैं, जिन्होंने मुगलों को घुटनों पर ला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था।” हा डायलॉग ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत होत आहे. ‘भुज : दी प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात भारतीय हवाई दलातले शूर अधिकारी विजय कर्णिक यांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट भारत-पाक युद्धातल्या काही सत्य घटनांवर आधारित आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, तेव्हा विजय कर्णिक हे भुज येथील हवाई तळाचे प्रमुख होते.
या हल्ल्यानंतर हा हवाई तळ नष्ट झाला होता; मात्र जवळच असलेल्या माधापार गावातल्या 300 महिलांच्या मदतीने कर्णिक यांनी हा पूर्ण हवाई तळ पुन्हा उभारला होता. इतिहासातली ही महत्त्वाची आणि रोमहर्षक घटना तुम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर पहायला मिळणार आहे. 13 ऑगस्ट रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी अजय देवगण अभिषेक बच्चनसोबत ‘दी बिग बुल’मध्ये झळकला होता. यामधल्या त्याच्या कामाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. आता भुज या सिनेमामधून पुन्हा तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण आणि सोनाक्षीसोबतच या चित्रपटामध्ये संजय दत्त नोरा फतेही यांसारखे कलाकारही आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Video 'हम शिवाजी महाराज की औलाद हैं..'; पाहा ‘भुज’चा दुसरा ट्रेलर, डायलॉगनी जिंकली प्रेक्षकांची मनं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm