belgaum_belgavkar_gallery.jpg | देशातील 24 विद्यापीठं बोगस; बेळगावातील 'ते' विद्यापीठ बोगस | belgaum news | belgavkar बेळगावकर

देशातील 24 विद्यापीठं बोगस; बेळगावातील 'ते' विद्यापीठ बोगस

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकातील एकमेव बोगस विद्यापीठ बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे

बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन यूनिवर्सिटी एज्युकेशन सोसायटी, गोकाक, बेळगाव

विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission - UGC) देशातील 24 स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं असून दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे. लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीने 24 विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वाधिक बोगस विद्यापीठं असणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात 8 बोगस विद्यापीठं असून दिल्लीमध्ये 7 आहेत. ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी 2 बोगस विद्यापीठं असून कर्नाटक (Badaganvi Sarkar World Open University Education Society, Gokak, Belgaum, Karnataka), केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी 1 विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील हे विद्यापीठ नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असं नाव आहे. या विद्यापीठांवरील कारवाईसंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, युजीसीने या विद्यापीठांसंबंधी हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली आहे.
तसंच आयोगाने राज्याचे सचिव, शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांच्या अख्त्यारित असणाऱ्या अशा विद्यापीठांवर कारवाई करण्यास सांगितलं असल्याचं ते म्हणाले आहेत. यासोबत अवैध डिग्री देणाऱ्या या संस्थांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. याशिवाय लखनऊमधील भारतीय शिक्षा परिषद आणि नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँण्ड मॅनेजमेंटकडून युजीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही संस्थांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
Uttar Pradesh :
Varanaseya Sanskrit Vishwavidyalaya, Varanasi

Mahila Gram Vidyapith, Allahabad

Gandhi Hindi Vidyapith, Allahabad

National University of Electro Complex Homeopathy, Kanpur

Netaji Subhash Chandra Bose Open University, Aligarh

Uttar Pradesh Vishwavidyalaya, Mathura

Maharana Pratap Shiksha Niketan Vishwavidyalaya, Pratapgarh

Indraprastha Shiksha Parishad, Noida.


Delhi :

Commercial University Ltd

United Nations University

Vocational University

ADR Centric Juridicial University

Indian Institution of Science and Engineering

Vishwakarma Open University for Self Employment

Adhyatmik Vishwavidyalaya (Spiritual University)
West Bengal :

Indian Institute of Alternative Medicine, Kolkata

Institute of Alternative Medicine and Research, Kolkata

Odisha :

Nababharat Shiksha Parishad, Rourkela

North Orissa University of Agriculture and Technology

Andhra Pradesh :

Christ New Testament Deemed University, Andhra Pradesh

Maharashtra :

Raja Arabic University, Nagpur

Karnataka :

Badaganvi Sarkar World Open University Education Society, Gokak, Belgaum

Kerala :
St John's University, Kerala

Puducherry :

Sree Bodhi Academy of Higher Education