बेळगाव : बॅ. नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर सर्कल रस्ते काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ

बेळगाव : बॅ. नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर सर्कल रस्ते काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आज गुरुवारी शहापूर बॅ. नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर सर्कल दरम्यानच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटिकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या मार्गावरील दुभाजकावर दर्जेदार दुकानगाळे बांधण्यात येत असून रस्त्याशेजारील गटाराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आज एकाबाजूच्या रस्ते काँक्रीटीकरण कामाला चालना देण्यात आली.
यावेळी बोलताना दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी निर्माण करण्यात येणारा हा सिमेंट काँक्रिट रस्ता 30 वर्षांपर्यंत चांगला राहील, असे सांगितले. यावेळी आमदार अभय पाटील यांनी बांधण्यात येत असलेल्या दुकानगाळ्यांची पाहणी केली. तसेच रस्ता व दुकानगाळ्यांचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना संबंधित ठेकेदारांना दिली. यावेळी आमदारांनी उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या समस्या एकूण घेऊन समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी तानाजी शिंदे, नितीन जाधव, राजेंद्र पवार, हिरालाल चव्हाण, नामदेव बाचीकर, हरीश दिवटे यांच्यासह अन्यमान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बॅ. नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर सर्कल रस्ते काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm