बेळगाव-दिल्ली विमान सेवेला प्रारंभ;

बेळगाव-दिल्ली विमान सेवेला प्रारंभ;

belgavkar.com | belgaum | belgavkar

सोमवार आणि शुक्रवार दोन दिवस सेवा

बेळगाव-दिल्ली विमान सेवेला प्रारंभ झाला आहे. आठवड्यातून दोनदा (सोमवार आणि शुक्रवारी) ही सेवा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. खासदार मंगला अंगडी, खासदार इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत या विमान सेवेचा शुभारंभ करण्यात आला. बेळगाव-दिल्ली विमानसेवा लेह पर्यंत मिळणार आहे. बेळगाव दिल्ली विमानतळ मुळे केंद्रीय दलामध्ये काम करणारे जवान, अधिकारी, उद्योजक, व्यापाऱ्यांना सदर विमान सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
दिल्लीहून दर सोमवारी आणि शुक्रवारी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी विमान बेळगावकडे भरेल. परतताना सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हेच विमान बेळगावहून दिल्लीकडे प्रयत्न करेल. शुक्रवारी सायंकाळी सांबरा विमानतळावर दिल्लीहून बेळगावात दाखल झालेल्या विमानाचे अग्निशामक दलाच्या बंबांनी पाण्याच्या फवार्‍याने स्वागत केले.
विमान सेवेच्या पहिल्या दिवशी दिल्लीहून 147 प्रवासी बेळगाव दाखल झाले तर, परतीच्या प्रवासात 131 प्रवाशांनी दिल्लीकडे उड्डाण भरले. दिल्ली - बेळगाव विमान सेवेचा शुभारंभ निमित्त फ्लाय एव्हिएशनतर्फे संगीत कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. शुभारंभ कार्यक्रमावेळी माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार अनिल बेनके उपस्थित होते. सांबरा विमानतळाचे कार्यकारी संचालक राजेश कुमार मौर्य यांनी सर्वांचे स्वागत केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव-दिल्ली विमान सेवेला प्रारंभ;
सोमवार आणि शुक्रवार दोन दिवस सेवा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm