अखेर बेळगाव दक्षिणमध्ये स्वतंत्र उपनोंदणी कार्यालयाचे उदघाटन

belgavkar.com | belgaum | belgavkar

आमदार अभय पाटील

बेळगाव : वकिलांचा विरोध झुगारत दक्षिण विभागासाठी मंजूर केलेल्या स्वतंत्र उपनोंदणी कार्यालयाचे उदघाटन झाले आहे. आमदार अभय पाटील यांनी या कार्यालयाचे उदघाटन केले. तिसरे रेल्वे गेट जवळील सुभाषनगरला सरकारला सर्वात जास्त महसूल देणारे उपनोंदणी (सब रजिस्ट्रार ऑफिस) कार्यालय सुरु झाले आहे. त्यामुळे बेळगाव दक्षिण व उत्तर या स्वरुपाची विभागणी उपनोंदणी कार्यालयाच्या पातळीवर होऊन कामकाजाला सुरुवात झाली आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उपनोंदणी कार्यालय असून तेथून तालुक्याचे कामकाज चालायचे. परंतु, अलीकडे बेळगाव दक्षिण विभागासाठी स्वतंत्र उपनोंदणी कार्यालय मंजूर केले. आमदार पाटील म्हणाले, बेळगाव दक्षिण विभागामधील जनतेला सोयीस्कर ठरावे, या उद्देशाने स्वतंत्र उपनोंदणी कार्यालय स्थापले आहे. यामुळे उत्तरमधील कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण राहील आणि जनतेला सोयीस्कर ठरेल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अखेर बेळगाव दक्षिणमध्ये स्वतंत्र उपनोंदणी कार्यालयाचे उदघाटन
आमदार अभय पाटील

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm