बेळगाव : त्या 14 विद्यार्थ्यांना मिळवून दिला न्याय

बेळगाव : त्या 14 विद्यार्थ्यांना मिळवून दिला न्याय

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : नुकतेच दहीवी पास झालेल्या 14 विद्यार्थ्यांना External दाखवून शाळेचे Leaving Certificate देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना काॅजजला प्रवेश घेण्यासाठी अडचण आणणाऱ्या वडगाव येथील एका खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राचार्याला मराठी भाषिक कार्यकर्त्यांसह श्रीराम सेना हिंदूस्थानच्या रमाकांत कोंडुस्करांनी जाब विचारून चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे शिक्षण संस्थेतील गैरप्रकार उघड झाल्यामुळे घाबरलेल्या प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना LC देण्याचे मान्य केले.
पारिजात कॉलनी (वडगाव) येथील एका शिक्षण संस्थेमधील इयत्ता दहावी उत्तीर्ण 14 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यास संस्थेकडून ‘तुम्ही एक्सटर्नल आहात’ असे सांगून नकार दिला जात होता. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले होते. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर व इतरांकडे याबाबतची तक्रार केली. या शिक्षण संस्थेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग चालविले जातात. नववीमध्ये कमी गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहावीच्या परीक्षेवेळी कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या गेल्या.
परीक्षेनंतर संबंधित विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला अर्थात स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात नकार दिला जात होता. परिणामी संबंधित 14 विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशात मोठा अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात आज सकाळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शिवसेनेचे दत्ता जाधव, माजी नगरसेवक राजू बिर्जे, हभप शंकर बाबली महाराज, युवा कार्यकर्ते सागर पाटील व अमोल देसाई यांच्यासह श्रीराम सेना, शिवसेना व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी पालक वर्गासमवेत जाऊन संबंधित शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना जाब विचारून चांगलेच धारेवर धरले. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्यामुळे सदर प्रकार गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर देखील घालण्यात आला.
स्वतः रमाकांत कोंडुसकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. गटशिक्षणाधिकार्‍यांनी तात्काळ त्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना फोन करून त्यांची चांगलीच कानउघडणी केली. स्वतःच्याच शाळेतील विद्यार्थ्यांना एक्स्टर्नल दाखविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा जाब विचारून गटशिक्षणाधिकार्‍यांनी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका, अशी ताकीद प्राचार्यांना दिली. प्राचार्यांनी उद्या बुधवारी सकाळी संबंधित विद्यार्थ्यांना स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचे मान्य केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्या 14 विद्यार्थ्यांना मिळवून दिला न्याय

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm