बेळगाव : त्या विद्यार्थ्याला केली मदत

बेळगाव : त्या विद्यार्थ्याला केली मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

त्यांचा मदतीसाठी पुढाकार;
आवाहन मदतीचे

बेळगाव : बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे व कर्मचाऱ्यांच्या वतीने झाडशहापूर येथील गरीब विद्यार्थी ज्ञानेश्वर सोमनाथ मयेकर याच्या उपचारासाठी ₹ 5000 रुपयांची मदत करण्यात आली. ज्ञानेश्वर झाडशहापूर येथे शालेय शिक्षण घेत आहे. त्याला ब्लड कॅन्सरचा सामना करावा लागत आहे. आई - वडील शेतकरी असल्याने घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांनी मदतीचे आवाहन केले होते.
फेसबुक फ्रेंड सर्कलचे संस्थापक संतोष दरेकर यांनी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. विजय मोरे यांनी मदतीचा धनादेश सोमनाथ यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विकी सिंग, विजय भंडारी, दापा राजेश वेर्णेकर, बलराम पाटील, उमेश हिरोजी, नीलेश नाईक उपस्थित होते.
ज्ञानेश्वरचे वडील शेतकरी असून त्यांनी आतापर्यंत उपचारासाठी 4 लाख खर्च केले असून अजून 2 ते 3 लाखांची गरज आहे. त्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. फेसबुक फेंड्स सर्कल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन दिवसांत एक लाखाची मदत कॅन्सरग्रस्त रूग्णाच्या उपचारासाठी जमा करण्यात आली.
ज्ञानेश्वरच्या मदतीसाठी पुढे आलेल्या दानशूरांचे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी आभार मानले. मुलाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
Account Details : Karnataka Vikas Grameena Bank , Branch Desur Belgaum
Account Holder Name : Mr Dhyaneshwar M/G Madhuri Somnath Mayekar
Account no : 89086960572
IFSC CODE : KVGB0002217
Phone Pe no : 7353349760
UPI - mayekarsomnath11@okaxis

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्या विद्यार्थ्याला केली मदत
त्यांचा मदतीसाठी पुढाकार; आवाहन मदतीचे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm