बेळगावात विशेष बालकांसाठी राज्यातील पहिले खास उद्यान;

belgavkar.com | belgaum | belgavkar

₹ 1 कोटी रुपये मंजूर - आमदार अभय पाटील

टिळकवाडीतील महात्मा फुले उद्यानात हे स्वतंत्र उद्यान

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेळगावात विशेष बालकांसाठी खास उद्यानाची (Garden) निर्मिती करण्यात येत आहे. आमदार अभय पाटील यांच्या कल्पनेतून उद्यान साकारत असून यासाठी ₹ 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मनोरुग्ण मुलांसाठी निर्माण करण्यात येत असलेले राज्यातील हे पहिलेच उद्यान आहे. या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच उदघाटन होणार आहे. बेळगावात दोन हजारांहून अधिक विशेष मुले आहेत. त्यांच्या शारीरिक आणि भौतिक विकासासाठी हे उद्यान उपयोगी ठरणार आहे.
टिळकवाडीतील महात्मा फुले उद्यानात हे स्वतंत्र उद्यान निर्माण करण्यात आले आहे. आमदार पाटील आणि अधिकाऱ्यांनी या उद्यानाच्या निर्मितीआधी पुणे व गोवा येथे जाऊन माहिती संग्रहित केली. येथील विशेष मुलांना कोणत्या प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते ? त्यांच्या गरजा काय आहेत ? त्यांना काय आवश्यक आहे ? आदींचा अभ्यास करुन या उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. या उद्यानात केवळ गतीमंद, मतीमंद मुले आणि त्यांच्या पालकांनाच प्रवेश राहणार आहे. यासाठी खास पासची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या उद्यानात फन जिम, जपिंग जपांग, कलर टब, वॉकर, चार प्रकाराचे स्विंग्स, खुले सभागृह आणि इतर आवश्यक साहित्य राहणार आहे. उद्यानाचा कायम वापर व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गतीमंद आणि मतीमंद मुलांची गरज ओळखून याठिकाणी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या मुलांच्या पालकांसाठीही अनेक साधने याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकंदरित मुलांसह त्यांच्या पालकांवरील ताण कमी व्हावा, यादृष्टीने या उद्यानाची निर्मिती कार्य हाती घेण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात विशेष बालकांसाठी राज्यातील पहिले खास उद्यान;
₹ 1 कोटी रुपये मंजूर - आमदार अभय पाटील

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm