बेळगावचा मास्टरप्लॅन या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करा...

बेळगावचा मास्टरप्लॅन या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करा...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगावचा मास्टरप्लॅन (सीडीपी - Comprehensive Development Plan) सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावा व कणबर्गी निवासी योजनेचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू करावे, असा आदेश नगरविकास मंत्री बैराती बसवराज यांनी दिला. बेळगावसह राज्यातील 26 शहरांच्या मास्टरप्लॅनच्या कामाचा तसेच विविध नगर विकास प्राधिकरणच्या कामांचा आढावा नगरविकास मंत्र्यांनी घेतला. त्या बैठकीत त्यांनी बेळगावच्या मास्टरप्लॅन व कणबर्गी निवासी योजनेची माहिती घेतली.
बैठकीला बुडा (BUDA - Belgaum Urban Development Authority - बेळगाव नगर विकास प्राधिकरण) आयुक्त प्रीतम नसलापुरे उपस्थित होते. त्यांनी मास्टरप्लॅनचे काम अद्याप बेसमॅप व सर्वेक्षण स्तरावरच असल्याची माहिती दिली. बेळगावच्या मास्टरप्लॅनचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. मास्टरप्लॅन तयार करण्यासाठी ई - जीआयएस कंपनीला 'बुडा'कडून कंत्राट देण्यात आले आहे. यांनी मास्टरप्लॅन कशा पद्धतीने तयार केला जाणार, त्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जाणार, याची माहिती घेतली.
अमृत योजनेतून जीआयएस आधारीत असा मास्टप्लॅन तयार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 9 शहरांचा मास्टरप्लॅन तयार केला जाणार असून त्यात बेळगाव, हुबळी धारवाड व गदग या तीन शहरांचा समावेश आहे. या कामाचा ठेका ई - जीआयएस कंपनीला मिळाला असून 4 सप्टेंबर रोजी शासनाकडून कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. ईजीआयएस कंपनीला मास्टरप्लॅनचे जे काम दिले आहे, त्यात बेळगाव शहर व बुडा कार्यक्षेत्रातील सध्याच्या 27 गावांचा समावेश आहे. बुडा कार्यक्षेत्रात आधी बेळगाव शहरासह 25 गावे होती. त्यात बस्तवाड व शगनमट्टी या दोन गावांचा समावेश नव्याने करण्यात आला. शहराचा सध्याचा मास्टरप्लॅन 2014 साली मंजूर झाला असून तो 31 मार्च 2021 पर्यंत अंमलात असणार आहे.
बुडामध्ये नव्याने समाविष्ट होणारी गावे
निलजी, मुतगा, सांबरा, शिंदोळी, बसरीकट्टी, बाळेकुंद्री खुर्द, बाळेकुंद्री बुद्रुक, होनिहाळ, माविनकट्टी, मास्तमर्डी, धामणे, येळ्ळूर, अवचारहट्टी, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, मण्णूर, सुळगे, आंबेवाडी, कल्लेहोळ, होनगा, कडोली, अलतगा, जाफरवाडी, कलखांब, आष्टे, मुचंडी, कोंडस्कोप.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावचा मास्टरप्लॅन या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करा...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm