भारत यावर्षी आपला 71वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहे. देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील राजपथावर सैन्यदलाच्या संचलनाचं आयोजन करण्यात येत. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आलेले प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संचलन मोठ्या दिमाखात होते. ध्वजारोहणानंतर होणाऱ्या या संचलनात देशाभिमानाने प्रफुल्लित असे चेहरे पाहायला मिळतात. यावर्षीही राजपथावर आयोजित करण्यात येणाऱ्या संचलनात तिन्ही प्रमुख सैन्यदल जवानांसह अन्स सुरक्षा तुकड्या, विविध राज्यातील विद्यार्थी आणि कलाकारांचाही समावेश असणार आहे. या लक्षवेधी संचलनामध्ये शौर्य, कला, वीरता असे विविध पैलू पाहता येणार आहे. यंदाच्या वर्षीची ही परेड बेळगावकरांसाठी खास असणार आहे.
belgavkar
येळ्ळूर गावाचा सुपुत्र नामदेव रामचंद्र देसाई याची प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी निवड झाली आहे. बुधवारी दिल्लीत थल सेना (सैन्य दिवस - Army Day) दिनानिमित्ताने झालेल्या पथसंचालनात नामदेव सहभागी झाला होता. नामदेव हा इंडियन आर्मी मध्ये जवान म्हणून कार्यरत आहे.
वयाच्या 21 व्या वर्षी 2016 मध्ये भर्ती
प्राथमिक शिक्षण - येळ्ळूरवाडी शाळा
माध्यमिक शिक्षण : श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर
बीएससी शिक्षण - बी.के.कॉलेज
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदा वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. 90 मिनिटांच्या परेड दरम्यान विविध राज्यांतील 23 वेगवेगळ्या रथांमधून भारतातील सांस्कृतिक विविधतेती झलक पहायला मिळणार आहे. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांची खास मोटारसायकल प्रात्याक्षिक प्रदर्शित केली जाणार आहे.