बेळगाव : अलतगेत श्रमदानातून स्वच्छता

बेळगाव : अलतगेत श्रमदानातून स्वच्छता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : श्रावणमासातील शेवटच्या रविवारचे औचित्य साधून अलतगा येथील युवकांनी ब्रह्मलिंगेश्वर मंदिरासह स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविली. स्मशान भूमीत तणनाशक औषध फवारणी केली. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने ब्रह्मलिंगेश्वर मंदिरात शेकडो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. धार्मिक विधी आयोजित करण्यात येतात. त्याचबरोबर स्मशानभूमीत झुडपे माजली होती. याची दखल घेऊन श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य विनोद शिंदे, मारुती पाटील, प्रकाश पाटील, किशोर धुडूम, विनायक पाटील, कल्लापा होनगेकर, विवेक पाटील, बालाजी आलोजी, श्रीधर धुडूम, दयानंद देसाई यांनी सहभाग घेतला. पावसामुळे स्मशानात तण वाढले होते. झुडपे माजली होती. यासाठी तणनाशकाची फवारणी केली. विनोद शिंदे, मारुती पाटील यांनी आर्थिक सहकार्य केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अलतगेत श्रमदानातून स्वच्छता

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm