बेळगाव : आज सकाळी एका ठिकाणी श्री किरण जाधव (भाजपा कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव) यांनी एक वृद्ध व्यक्ती पाहिली. तो वृद्ध गुडशेड रोड रस्त्यावर पडला होता आणि त्याला अत्यंत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. भुकेने त्या इसमाची स्थिती पाहून लागलीच किरण जाधव यांनी 108 या रुग्णवाहिकेला संपर्क साधून बोलावले आणि त्यांनी त्या वृद्धाला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
त्या वृद्ध व्यक्तीला जिल्हा रुग्णालयातील योग्य उपचारा दिल्यानंतर त्याला वृद्धाश्रमात हलवले जाईल अशी माहिती श्री किरण जाधव यांनी दिलीयं.