बेळगाव  : त्याग व समाजसेवा प्रत्येकाचे कर्तव्य

बेळगाव : त्याग व समाजसेवा प्रत्येकाचे कर्तव्य

belgavkar.com | belgaum | belgavkar

मोफत रुग्णवाहिका सेवा प्रारंभ

बेळगाव - संकेश्वर : जीवनात प्रत्येकाने राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व द्यावे. त्याग व समाजसेवा प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मत श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले. ते येथे संघटनेच्या वतीने शनिवारी मोफत रुग्णवाहिका सेवा प्रारंभ कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी श्री विद्यानृसिंह भारती स्वामींच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन झाले. श्री शंकराचार्य मठाच्या आवारात कार्यक्रम झाला. जयप्रकाश सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी पवन कत्ती, संजय नष्टी याचेही भाषण झाले. येथील हिंदू स्मशानभूमीत मोफत अंत्यविधी करणाऱ्या प्रकाश इंगळे यांचा सत्कार झाला. यावेळी नगराध्यक्षा सीमा हतनुरे, उपनगराध्यक्ष अजित करजगी, स्थायी समिती सभापती सुनील पर्वतराव, डॉ. मंदार हावळ, आरोग्याधिकारी डॉ. दत्तात्रय दोडमनी, उद्योजक राजू बोरगावी यांच्यासह येथील श्रीराम सेना हिंदुस्थानचे सभासद उपस्थित होते. राजशेखर घस्ती यांनी सूत्रसंचालन केले. शाम यादव यांनी आभार मानले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्याग व समाजसेवा प्रत्येकाचे कर्तव्य
मोफत रुग्णवाहिका सेवा प्रारंभ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm