बेळगाव : ऑॅफर देण्यासाठी कोण आले होते.? मराठा समाजाला मंत्रीमंडळात स्थान द्या

बेळगाव : ऑॅफर देण्यासाठी कोण आले होते.?
मराठा समाजाला मंत्रीमंडळात स्थान द्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

ऑपरेशन लोटस;
भाजपकडून पैशाची ऑफर : माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील

बेळगाव : 2019 मध्ये माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेस युती सरकारला पाडण्यासाठी आणि भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला ‘भरभक्कम’ पैशाची ऑॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार श्रीमंत पाटील (कागवाड) यांनी केला होता. भाजप प्रवेशासाठी पैशाची ऑफर दिल्याचे सांगितल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत आपल्याला कल्पना नाही. पण, पैशाची ऑॅफर देण्यासाठी कोण आले होते, याचा खुलासा माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी करावा, असे म्हटले आहे. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी शनिवारी एका कार्यक्रमात कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश करताना पैशाची ऑफर होती. पण, ती ऑफर मी नाकारल्याचा गौप्यस्फोट केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. याबाबत रविवारी अथणीतील एका कार्यक्रमात श्री. सवदी यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी श्रीमंत पाटील यांचे वक्तव्य नेमके काय अर्थाने होते, हे मला माहीत नाही, असे सांगितले. पण, त्यांचा विषय माझ्या कानावर आला आहे. परंतु, ऑफर कुणी दिली व पैसे देण्यासाठी कोण आले होते, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
नियमानुसार केवळ 34 जणांना मंत्रीपद मिळते. प्रत्येकाला मंत्रीपद देणे शक्य नाही. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज होऊन टीका करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी सवदी यांना लगावला. राज्यात कॉंग्रेस-धजद पक्षाचे सरकार असताना माजी मंत्री रमेश जारकीहोळींसह 17 जणांनी भाजपात प्रवेश केल्याने युती सरकारचे पतन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक होऊन त्यात श्रीमंती पाटील विजयी झाले. त्यांना वस्त्रोद्योग मंत्रीपदही देण्यात आले. परंतु, अलीकडे राज्यात नेतृत्व बदल झाल्याने पाटील यांचे मंत्रीपद गेले. तेव्हापासून श्री. पाटील यांच्याकडून मंत्रीपदासाठी पाठपुरावा सुरु आहे. मराठा समाजाच्या प्रतिनिधीला मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी होत आहे.
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी 2019मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला मी म्हणेन तितका पैसा देण्याची ऑफर भारतीय जनता पक्षाने दिली होती. परंतु मी पैशाची अपेक्षा न करता पक्षात चांगले स्थान मिळावे अशी मागणी केली होती, अशी खळबळजनक माहिती माजी मंत्री आणि कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली. कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावातील विकास कामांचे उदघाटन केल्यानंतर माजी मंत्री श्रीमंत पाटील पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला पैशाची ऑफर देण्यात आली होती हे खरे आहे. तथापि समाजाचे हित साधण्यासाठी मी चांगले मंत्रीपद आपल्याला मिळावे ही मागणी समोर ठेवली होती, असे पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातून श्रीमंत पाटील यांना वगळण्यात आले. याचा निषेध करून मराठा समाजातर्फे आंदोलनंही करण्यात आली. यासंदर्भात बोलताना मला मंत्री मंडळातून वगळण्यात आल्याचा अनुषंगाने माझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच त्यांनी भावी काळात मला मंत्रीपद मिळेल असा विश्वास व्यक्त केला असल्याचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी सांगितले.
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी 2019मध्ये भाजप नेते येडियुरप्पा यांनी ऑपरेशन लोटसच्या येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. 2019मध्ये सरकार पाडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचलं होतं, असा दावा काँग्रेस आणि जेडीएसने केला आहे. 2018 मध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-जेडीएसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2019मध्ये सत्ताधारी आघाडीतील काही आमदार भाजपला येऊन मिळाले होते. त्यामुळे राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्यात आलं होतं.
कर्नाटक विधानसभा निवडणूक : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 2018मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. राज्यात बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे. कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता होती. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. काँग्रेस-जेडीएसचे जवळपास 15 आमदार फुटल्याने येडियुरप्पा यांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती. यात आमदार श्रीमंत पाटील यांचाही समावेश होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ऑॅफर देण्यासाठी कोण आले होते.? मराठा समाजाला मंत्रीमंडळात स्थान द्या
ऑपरेशन लोटस; भाजपकडून पैशाची ऑफर : माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm