बेळगाव : मला भाजपात प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती;
आमदार श्रीमंत पाटील

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असं भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील (कागवाड, बेळगाव) यांनी रविवारी सांगितलं. मात्र “मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही,” असंही पाटील म्हणाले.
“मी मला दिलेली पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले गेले होते. त्यावेळी मला पाहिजे तेवढे पैसे मागता आले असते. मात्र, मी पैशांची मागणी केली नाही. मी लोकांची सेवा करण्यासाठी मंत्रीपदाची मागणी केली होती,” असंही पाटील यांनी म्हटलंय. “मला माहित नाही की मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असं आश्वासन मला देण्यात आलंय. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझं बोलणं झालंय,” असंही पाटील यांनी सांगितलं.
श्रीमंत पाटील हे बेळगाव जिल्ह्यातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते काँग्रेस आणि जनता दल-सेक्युलर (जेडीएस) मधून भाजपमध्ये सामील झालेल्या 16 आमदारांपैकी एक होते. या आमदारांनी पाठिंबा काढून घेत भाजपात प्रवेश केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते. दरम्यान, राज्यात येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांना मंत्रिपद देण्यात आले होते. परंतु, बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. आजपासून कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या आमदारांनी अधिवेशनात नाराजी व्यक्त करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी 2019मध्ये भाजप नेते येडियुरप्पा यांनी ऑपरेशन लोटसच्या येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. 2019मध्ये सरकार पाडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचलं होतं, असा दावा काँग्रेस आणि जेडीएसने केला आहे. 2018 मध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-जेडीएसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2019मध्ये सत्ताधारी आघाडीतील काही आमदार भाजपला येऊन मिळाले होते. त्यामुळे राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्यात आलं होतं.
कर्नाटक विधानसभा निवडणूक : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 2018मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. राज्यात बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे. कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता होती. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. काँग्रेस-जेडीएसचे जवळपास 15 आमदार फुटल्याने येडियुरप्पा यांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती. यात आमदार श्रीमंत पाटील यांचाही समावेश होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मला भाजपात प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती; आमदार श्रीमंत पाटील

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm