बेळगावच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने घेतली राज ठाकरेंची भेट! 

बेळगावच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने घेतली राज ठाकरेंची भेट! 

belgavkar.com | belgaum | belgavkar

633 मतं वार्ड क्रमांक 27;
14 मतांनी केला होता भाजपाच्या संदिप जाधव यांचा पराभव

मुंबई : बेळगाव महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे (वार्ड क्रमांक 27) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी रवी साळुंखे यांचे बेळगाव महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले. सोमवारी सकाळी रवी साळुंखे यांनी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी रवी साळुंखे यांच्यासोबत एक शिष्टमंडळ सुद्धा उपस्थित होते.
या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून रवी साळुंखे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यासंबंधीचे ट्विट मुंबई न्यूजने केले आहे. दरम्यान, काल नगरसेवक रवी साळुंखे यांनी शिवसेनेचे नेते आणि बेळगाव सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठी भाषिक आमदार निवडून यावेत, यासाठी एकनाथ शिंदे यांनी बेळगावसाठी रणनीती ठरवावी आणि यासाठी त्यांनी बेळगावात यावे, अशी विनंती रवी साळुंखे यांनी केली.
याचबरोबर, रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष कार्यालयात जाऊन अविनाश जाधव यांचीही भेट घेतली होती. यावेळी अविनाश जाधव यांनी रवी साळुंखे यांचा सत्कार केला. यावेळी प्रतीक गुरव, आनंद टपाले, दशरथ नांगरे, सुमंथ जाधव, अप्पाजी बस्तवाडकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने घेतली राज ठाकरेंची भेट! 
633 मतं वार्ड क्रमांक 27; 14 मतांनी केला होता भाजपाच्या संदिप जाधव यांचा पराभव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm