'पूर्वी 'अब्बाजान' म्हणणारे सर्वजण गरिबांचे रेशन हडपायचे', योगींचा ...

belgavkar.com | belgaum | belgavkar

'कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केलं', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान

कोरोना विषाणू विरोधात अतिशय नेटानं प्रतिकार केल्याचा दावा करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी कुशीनगर येथील जनसभेला संबोधित करताना एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. देशातील इतर राज्यांची सरकारं कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. पण आम्ही तर कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकलं आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलेलं असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीनं जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 
भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात होता, मात्र आता सर्वांना समान न्याय मिळतो असे सांगितले. यावेळी पुढे त्यांनी 2017 पुर्वी जे लोक अब्बा जान, अब्बा जान म्हणत होते, तेच सगळ रेशन संपवत होते अशी टीका केली आहे. यापूर्वी कुशीनगरचं रेशन नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये जात होतं, मात्र आता गरिबांच रेशन कुणीही पळवू शकत नाही. जर एखाद्याने तसा प्रयत्न केला तर तो तुरुंगात जातो. योगी आदित्यनाथ यांनी आज कुशीनगर परिसरात एकूण 120 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण केलं. यासोबत ते अलावा रामकोला विधानसभा मतदार संघाच्या कप्तानगंज येथे आयोजित एका शिलान्यास कार्यक्रमाला देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारनं केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवला. तसंच समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. अब्बाजान म्हणणारे सर्वजण गरीबांचा राशन हडपायचे. कुशीनगरचा राशन तेव्हा थेट नेपाळ, बांगलादेश पर्यंत पोहोचत होतो. कुशीनगर परिसरत शेती, धर्म आणि श्रद्धा यासाठी ओळखला होता. जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात जाणं बाकी आहे. एकूण चारशे कोटींपेक्षा अधिकच्या योजनांचं लोकार्पण करायचं आहे. हे लोकार्पण तर नुसता ट्रेलर आहे. अद्याप बरंच काही होणं बाकी आहे. भगवान बुद्ध यांना समर्पित मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी देखील जरुर येणार आहे, असं योगी म्हणाले. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

'पूर्वी 'अब्बाजान' म्हणणारे सर्वजण गरिबांचे रेशन हडपायचे', योगींचा ...
'कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केलं', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm