बेळगाव : उड्डाणपुलावरून कार कोसळल्याने दुचाकीस्वार ठार

बेळगाव : उड्डाणपुलावरून कार कोसळल्याने दुचाकीस्वार ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - संकेश्वर : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वर - गडहिंग्लज मार्गावरील बायपासजवळ डी. फार्मसी महाविद्यालयानजिक शनिवारी रात्री उशीरा भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटून कार उड्डाणपुलावरून दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार ठार झाला. कपिल वैजप्पा हेरेकर (वय 34, रा. हौसिंग कॉलनी, संकेश्वर) असे त्याचे नाव आहे. कपिल हा दुचाकीवरून गणेशोत्सव मंडपाच्या कामानिमित्त अनंत विद्यानगर येथे गेला होता.
तेथील काम आटोपून कपिल दुकानाकडे परतताना राष्ट्रीय महामार्गावरील संकेश्वर - गडहिंग्लज मार्गावरील बायपास ब्रिजवरुन भरधाव जाणाऱ्या कारचालक डॉ. सिध्दराम मुतगी यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते ब्रिजवरुन कपिलच्या दुचाकीवर कोसळल्याने कपिल गंभीररित्या जखमी झाला. महामार्गावर डी. फार्मसी महाविद्यालयानजिक उड्डाणपुलावरून निपाणीहून बेळगावच्या दिशेने जाणारी कार (KA 22 MA 1085) उड्डानपुलाखालुन निपाणीहून संकेश्वरला जाणार्‍या दुचाकीवर (KA 23 EX 7996) कोसळल्याने दुचाकीस्वार कपिल हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला आहे.
जखमी झालेल्या कपीलला बेळगाव येथील केएलई रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. संकेश्वर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणपती कोग्गेनहळ्ळी हे अधिक तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : उड्डाणपुलावरून कार कोसळल्याने दुचाकीस्वार ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm