बेळगाव ता. निपाणी : बोरगाव येथील बोरगाव-इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या पद्मचंद जैन यांच्या मालकीच्या बोरगाव प्रोसेसला बुधवारी रात्री अचानक आग लागली. त्यामध्ये कारखान्यातील कापड, मशिनरीसह साहित्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र या घटनेत सुदैवाने जीवित हानी टळली. बोरगाव येथील इचलकरंजी रोडवर पद्मचंद जैन यांच्या स्व:मालकीचा बोरगाव प्रोसेस कारखाना आहे.
बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे कापड प्रोसेसिंग युनिटला अचानक आग लागली. या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले. यामध्ये केबल, मशिनरी, मोटार , कापडासह अन्य साहित्य भस्मसात झाले. यामध्ये सुमारे दीड कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच सदलगा अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदलगा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.