बेळगाव : हायवेवर टँकरच्या धडकेत महिला ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भरधाव टँकरने मागून धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली हुक्केरी तालुक्यातील वृद्ध महिला ठार झाली, तर तिचा जावई तरुण जखमी झाला. आवाक्का कुडकट्टी (वय 60, रा. शहाबंदर, ता. हुक्केरी ) असे मृत महिलेचे नाव आहे. आवाक्का या केदनूर येथे आपल्या मुलीकडे आल्या होत्या. गणेशोत्सवात काही दिवस राहिल्यानंतर शहाबंदरला सोडण्यासाठी जावई दुचाकीवरून निघाले होते.
पुणे-बेंगळूर महामार्गावरून मुक्तीमठाजवळ गेले असता पाठीमागून आलेल्या टँकरची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दोघेही रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाले. दोघांना खासगी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचाराचा उपयोग न होता आवाक्का यांचा मृत्यू झाला. काकती पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हायवेवर टँकरच्या धडकेत महिला ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm