बेळगाव : मिरवणुक पाहायला जाणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू

बेळगाव : मिरवणुक पाहायला जाणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिकोडी : ममदापूरहून गळतग्याकडे भरधाव वेगाने जाताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात ममदापूरचा दुचाकीस्वार ठार झाला. गुरुवारी (16) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना ममदापूर अंबिका मंदिराजवळ घडली. अनिकेत सुरेश यादव (वय 20) असे मृत दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदलगा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, अनिकेत आपले मित्र संकेत संतोष कदम (वय 22) व लखन चिराप्पा चिंगळे (वय 20) यांच्यासह दुचाकीने ममदापूरहून गळतग्याकडे मिरवणुक पाहण्यासाठी जात होते. गळतगा-ममदापूर रस्त्यावर वसंत पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने जाताना दुचाकीस्वरावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडली. त्यात अनिकेत ठार झाला.
संकेत कदम, लखन चिंगळे जखमी असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदलगा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. उपनिरीक्षक रवींद्र आजन्नावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास सदलगा पोलिस करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मिरवणुक पाहायला जाणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm