बेळगाव देशात दुसर्‍या स्थानावर; मोदींच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; Corona Vaccination

बेळगाव देशात दुसर्‍या स्थानावर;
मोदींच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम;
Corona Vaccination

belgavkar.com | belgaum | belgavkar

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी देशातील कोरोना लसीकरणाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. शुक्रवारी जवळपास 2.50 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत. याआधी एका दिवसात 1.33 कोटी डोस देण्याचा रेकॉर्ड होता. कर्नाटकाची राजधानी बेंगलोर महानगरपालिकेने 4,09,977 जणांचे लसीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला तर बेळगाव जिल्ह्यात एका दिवसात 2,57,604 जणांचे लसीकरण झाले असून बेळगाव जिल्हा दूसर्‍या स्थानावर आहे.
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, की शुक्रवारी लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत दोन कोटी डोस दिले गेले. याआधी 27 आणि 31ऑगस्टला देशात एक कोटीहून अधिकांना कोरोना लस देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी दैनंदिन लसीकरणाचा हा रेकॉर्ड चीनच्या नावी होता. इथे जून महिन्यात सर्वाधिक 2.47 कोटी डोस दिले गेले होते. भारतानं चीनचा हा रेकॉर्ड मोडला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 1.10 लाख लसीकरण केंद्रांपैकी केवळ सुमारे 3400 केंद्रं खासगी आहेत. बाकीची सर्व म्हणजे एक लाखाहून अधिक केंद्रं सरकारी आहेत. म्हणजेच हा लसीकरणाचा विक्रम साध्य करण्यात सरकारच्या प्रयत्नांचा वाटा मोठा आहे, हे यावरून सिद्ध झालं आहे.
निवडणुका असलेली राज्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब याठिकाणच्या लोकांना लवकरात लवकर लसीचा निदान एक डोस देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या लसीची उपलब्धता वाढली आहे, सोबतच पुढच्या महिन्यात जायडस कॅडिलाची लसही उपलब्ध होणार आहे. सोबत स्पूतनिक लसीचा पुरवठाही वाढेल. सध्या भारतात तीन कंपन्यांच्या लसी दिल्या जात आहेत. तर, सहा कंपन्यांच्या लसींला मंजुरी मिळाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव देशात दुसर्‍या स्थानावर; मोदींच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; Corona Vaccination

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm