रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार पेन्शन;
पंतप्रधान वय वंदना योजना

belgavkar.com | belgaum | belgavkar

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY)

आपण वर्षानुवर्षे काम करतो. परंतु आपल्या निवृत्तीनंतर काय असा प्रश्न आपल्याला कायमच भेडसावत असतो. हीच बाब ध्यानात घेत केंद्र सरकारनं पंतप्रधान वय वंदन योजनेची सुरूवात केली. यामध्ये जर तुम्ही योग्यवेळी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली तर तुम्हाला चांगली रक्कम पेन्शनच्या रूपात मिळू शकते. या योजनेत सर्वाधिक 15 लाख रूपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. जर पती - पत्नी या दोघांचंही वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर अशा परिस्थितीत दोघेही या स्कीमचा फायदा घेऊ शकतात.
या स्कीममध्ये जास्तीतजास्त 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तसंच 3 वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर यासोबत कर्ज घेण्याची सुविधाही देण्यात येते. यामध्ये मासिक पैसे गुंतवल्यास 7.40, तिमाही 7.45, सहामाही 7.52 आणि वार्षिक पैसे गुंतवल्यास 6.60 टक्क्यांचं व्याज देण्यात येतं. या स्कीमसाठी तुम्हाला LIC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल किंवा आपण एजंटच्या माध्यमातून याचा लाभ देखील घेऊ शकता. जर तुम्ही हा विमा ऑफलाइन खरेदी केला, तर तुम्हाला ते परत करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी असेल. तर, ऑनलाइन खरेदी करताना हाच कालावधी 1 महिना असेल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार पेन्शन; पंतप्रधान वय वंदना योजना
Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY)

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm