बेळगाव : मिरवणुकीला बंदी, विसर्जन 9 च्या आत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : लाडक्या गणरायाला रविवारी भक्तिभावाने निरोप देण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरात 11 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, दोन फिरते कुंडही असतील. कोरोनामुळे रात्री 9 च्या आत विसर्जन आटोपावे लागणार असून, एका मूर्तीसोबत 10 कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे. एक हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जनासाठी दोन दिवसांपासूनच कपिलेश्वर तलावासह इतर तलावांची स्वच्छता करण्यात आली असून, नवे पाणीही सोडण्यात आले आहे.
मूर्तीसोबत 10 जण
अकरा ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
आरतीनंतर मूर्तीचे अधिकाऱ्यांकडे हस्तांतर
तलावाजवळ मनपाकडून स्वागत कक्ष
विसर्जनासाठी जेसीबी, क्रेनची व्यवस्थ
बाराशे पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त
कोरोनामुळे रात्री जमावबंदीचा आदेश असल्यामुळे रात्री 9 पूर्वीच गणेशाचे विसर्जन करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
येथे होणार विसर्जन
जुना कपिलेश्वर तलाव
नवा कपिलेश्वर तलाव
जकीनहोंडा तलाव
कलमेश्वर जुना तलाव
अनगोळ तलाव
वडगाव नाझर कॅम्प
जुने बेळगाव तलाव
ब्रम्हदेव तलाव, मजगाव
कणबर्गी तलाव
किल्ला तलाव
दोन फिरते टॅक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वेळेत विसर्जन करावे. नियमांचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग ध्यानात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. - रणजीत चव्हाण पाटील, अध्यक्ष, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ
बेळगाव शहरामध्ये यंदा 387 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 75 गणपतींची मंडपात तर उर्वरित श्रींची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली आहे. कपिलेश्वर तलावाकडे जाणारे रस्ते उद्या बॅरिकेडस् लावून अडवण्यात येणार आहेत. विसर्जनासाठी चार क्रेन, जेसीबीची व्यवस्था करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मिरवणुकीला बंदी, विसर्जन 9 च्या आत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm