बेळगाव : 8, एसीपी, 1200 पोलिस;
गणपती विसर्जन;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तीचे रविवारी विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी शहर आणि तालुक्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसली तरी विसर्जनासाठी 1200 पोलिसांची नियुक्ती केली आहे. त्यात 8 एसीपी, 60 पोलीस उपनिरीक्षक, 40 पोलीस निरीक्षक, 8 केएसआरपी प्लाटून, 10 सीएआर तुकड्यांचा समावेश आहे.
विसर्जनाला सकाळी 10 वाजता प्रारंभ करण्याचे व सायंकाळी 5 वाजता विसर्जन पूर्ण करण्याची सूचना पोलिस खात्याने केली आहे. परजिल्ह्यातूनही अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी एकूण 1200 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिली. रविवारी अनंत चतुर्दशीदिवशी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तसेच घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.
गतवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीवर बंदी असली तरी मोठ्या संख्येने गणेशभक्त रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जन काळात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या काळात पोलिसांची होयसाळ व शक्ती वाहने सातत्याने गस्तीवर असणार आहेत. सीसीटिव्ही कॅमेऱ्यासह साध्या वेशातील पोलिसांचीही नजर असणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 8, एसीपी, 1200 पोलिस; गणपती विसर्जन;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm