बेळगाव : त्याला अटक; हुंड्याच्या जाचाला कंटाळून 4 महिन्याच्या गर्भवती विवाहितेची आत्महत्या

बेळगाव : त्याला अटक;
हुंड्याच्या जाचाला कंटाळून 4 महिन्याच्या गर्भवती विवाहितेची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

हुंड्यासाठी छळ;
शहापूरात नवविवाहितेची आत्महत्या

बेळगाव : हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नवविवाहितेने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मुस्कान रोहिम कागजी (वय 20, रा. आळवण गल्ली, शहापूर) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघा विरोधात (पती रोहिम इम्तियाज कागजी, सासरे इम्तियाज कागजी व सासू हलिमा इम्तियाज कागजी) गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी पती रोहिमला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, बेळगाव शहरातील खंजर गल्ली येथील मुस्कान हिचा विवाह गेल्या आठ महिन्यांपूर्वी आळवण गल्ली (शहापूर) येथील रोहिम याच्याबरोबर झाला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून पती व सासरच्या मंडळीने माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ चालविला होता. त्यामुळे तिने ही माहिती आपल्या माहेरी दिली. त्यामुळे मुस्कान हिचा मामा जुबेर मुजावर यांनी पंधरा दिवसापूर्वी मुस्कानच्या घरी जाऊन ₹ 10000 रुपये दिले होते. तरीदेखील आणखी पैसे घेऊन ये असे म्हणत तिचा पुन्हा छळ चालविण्यात आला होता.
तू गळफास घेऊन मर आम्ही आराम राहतो, असे म्हणत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकिब मोहम्मदगौस मकानदार (रा. खंजर गल्ली) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी त्या नवविवाहितेच्या नातेवाईकांनी आणि माहेरच्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.
तिला तिचा पती रोहिम इम्तियाज कागजी, सासू-सासरे इम्तियाज कागजी व हलिमा इम्तियाज कागजी हे वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तिला माहेरकडून हुंडा घेऊन ये म्हणून मारबडव करत होते. यापूर्वी अनेकवेळा तिच्या सासरच्यांना ताकीद देण्यात आली होती. मात्र तरीदेखील तिचा जाच सुरूच होता. या जाचाला कंटाळून आमच्या मुलीने आत्महत्या केल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशाप्रकारे त्रास करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्याला अटक; हुंड्याच्या जाचाला कंटाळून 4 महिन्याच्या गर्भवती विवाहितेची आत्महत्या
हुंड्यासाठी छळ; शहापूरात नवविवाहितेची आत्महत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm