डेंग्यूचा धोकादायक प्रकार आढळला;
11 राज्यांना सतर्क राहण्याच्या केंद्राच्या सूचना

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशातील 11 राज्यांमध्ये डेंग्यूचे धोकादायक प्रकार नोंदवण्यात आले आहे. या 11 राज्यांना केंद्राने डेंग्यूच्या प्रकरणांचा लवकर शोध घेण्यासाठी, ताप हेल्पलाईन सुरू करण्यासाठी आणि पुरेशा टेस्टिंग किट, डासांवर फवारणीच्या औषधांसह आणि उपचारासाठी औषधे साठवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना परिस्थितीच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत आगामी काळात सण-उत्सावांच्या पार्श्वभूमीवर राज्यांना गर्दी आणि मेळावे टाळण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान, डेंग्यूने प्रभावित राज्यांना सेरोटाइप-2 डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपावर त्वरित तपासासाठी जलद प्रतिसाद दल तैनात करण्यास सांगितले आहे. तसेच राज्यांना हेल्पलाईन, वेक्टर नियंत्रणाच्या पद्धती, घरात मच्छर उत्पन्न होतील अशा जागा स्वच्छ ठेवण्यासह डेंग्यूची लक्षणे यासंदर्भात मोहीम राबवण्याची विनंती करण्यात आली आहे. सेरोटाइप-2 डेंग्यूची नोंद आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये करण्यात आली आहे.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोनासंदर्भाद आवश्यक ती खबरदारी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पॉझिटिव्हीटी रेट जास्त असलेल्या 15 राज्यांना दिले. या 15 राज्यांतील 70 जिल्ह्यांमध्ये करोनाची परिस्थिती चिंताजनक असून याठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यापैकी 34 जिल्ह्यांमध्ये तर हा रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं भूषण यांनी सांगितलं.
आगामी सणांचा हंगाम पाहता गर्दी टाळता येईल यासाठी सर्व आवश्यक खबरदारी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले. तसेच अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पूर्णपणे कमी झाल्यानंतर अचानक वाढली आहे. त्याचा संदर्भ देत आरोग्य पायाभूत सुविधा आणि आवश्यक औषधांचा साठा करा, असा सल्ला राज्याच्या आरोग्य प्रशासकांना देण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

डेंग्यूचा धोकादायक प्रकार आढळला; 11 राज्यांना सतर्क राहण्याच्या केंद्राच्या सूचना

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm