Public Provident Fund : दरमाह ₹ 1000 रुपये गुंतवा आणि मिळवा ₹ 12 लाख रुपये, काय आहे योजना?

belgavkar.com | belgaum | belgavkar

चांगल्या गुंतवणुकीच्या शोधात असाल तेही कोणत्याही धोक्याशिवाय तर पब्लिक प्रोविडंट फंड (PPF) उत्तम पर्याय ठरू शकतो. पीपीएफमध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही. याचे कारण सरकारकडून त्याला पूर्णपणे संरक्षण मिळते. तुम्ही त्यात गुंतवणूक करून चांगला नफा देखील मिळवू शकता. फक्त काळजीपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून पीपीएफमधून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. दरमहा फक्त ₹ 1000 रुपये जमा करून, तुम्ही 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळवू शकता.
किती व्याज मिळेल? केंद्र सरकार दर तिमाहीत पीपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात बदल करते. व्याज दर सामान्यतः 7 टक्के ते 8 टक्के असतो, जो आर्थिक परिस्थितीनुसार किंचित वाढू किंवा कमी होऊ शकतो. सध्या, व्याज दर 7.1 टक्के आहे, जो वार्षिक चक्रवाढ केला जातो. हे अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. तुम्ही पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. त्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. त्यानंतर तुम्ही हे पैसे काढू शकता. 
काय आहे संपूर्ण स्कीम? जर तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहा 1000 रुपये जमा केले तर ₹ 15 वर्षात तुमची गुंतवणुकीची रक्कम 1.80 लाख रुपये होईल. यावर 1.45 लाखांचे व्याज मिळेल. म्हणजेच, मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण 3.25 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही आणखी 5 वर्षे पीपीएफ खाते वाढवले ​​आणि दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 2.40 लाख रुपये होईल. या रकमेवर 2.92 लाखांचे व्याज मिळेल. अशा प्रकारे मॅच्युरिटीनंतर 5.32 लाख रुपये मिळतील. त्यानंतरही जर तुम्ही दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू ठेवली तर तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम 3.60 लाख रुपये होईल. यावर 8.76 लाख व्याज मिळेल. अशा प्रकारे मॅच्युरिटीनंतर एकूण 12.36 लाख रुपये मिळतील.
कर्ज सुविधा : जर तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली असेल तर कर्ज घेण्याची सुविधा देखील या खात्यावर उपलब्ध आहे. पीपीएफ खात्याची 6 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही थोडी रक्कम देखील काढू शकता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Public Provident Fund : दरमाह ₹ 1000 रुपये गुंतवा आणि मिळवा ₹ 12 लाख रुपये, काय आहे योजना?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm