बेळगाव : विसर्जनाला पहाट उजाडणार; अद्याप 10 गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी; पोलिसांचा लाठीमार महागात पडला

बेळगाव : विसर्जनाला पहाट उजाडणार;
अद्याप 10 गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी;
पोलिसांचा लाठीमार महागात पडला

belgavkar.com | belgaum | belgavkar

आमदारांनी आणला पोलिसांवर दबाव;
सकाळी 6 वाजता कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्तीचे शेवटला विसर्जन

बेळगाव : बेळगाव गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सोमवारी पहाटेपर्यंत संपण्याची शक्यता आहे. अद्यापही कपिलेश्वर उड्डाणपूलासह शहापूर एसपीएम रोडवर 10 गणेशमूर्ती विसर्जनासाठी रांगेत आहेत. पोलिसांनी गणेशभक्तांची गर्दी कमी करण्यासाठी एसपीएम रोड काॅर्नरवर केलेल्या लाठीचार्जमुळे आमदार अभय पाटील यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे. लाठीचार्जमध्ये काही युवक जखमी झाले, तर गर्दीत यावेळी महिलांसह लहान बालके असतानाही पोलिसांनी काठीचा वापर केला. याची माहिती मिळताच आमदारांनी एसीपींसह त्या पोलिसांवर संताप व्यक्त केला.

तसेच बेळगावकरांच्या वाढत्या गर्दीमूळे मिरवणूकीस अडथळा निर्माण झाला आहे. लवकर मिरवणूक संपवण्यासाठी प्रशानसाचा प्रयत्न असला तरी गर्दीमूळे मिरवणूक हळूहळू सरकत आहे. 10 गणपती मूर्ती रांगेत हळूवार सरकत आहे.
आमदारांनी आणलेल्या दबावामुळे पोलिसही आता बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे मिरवणूक संथगतीने डीचेच्या तालावर पुढे जात आहे.
बेळगाव पोलिसांनी केला लाठीचा वापर - गणपती विसर्जन मिरवणूक - कपिलेश्वर उड्डाणपूल - न्यु गुडशेड रोड काॅर्नर
सकाळी 6 वाजता कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्तीचे शेवटचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूक सौम्य लाठीमार सोडता सुरळित पार पडली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विसर्जनाला पहाट उजाडणार; अद्याप 10 गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी; पोलिसांचा लाठीमार महागात पडला
आमदारांनी आणला पोलिसांवर दबाव; सकाळी 6 वाजता कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्तीचे शेवटला विसर्जन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm