गोव्यात अखेर पर्यटन खुले;

belgavkar.com | belgaum | belgavkar

कॅसिनो 50 टक्के क्षमतेने उघडणार, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सबरील निर्बंधही शिथिल (लसीचे दोन्ही डोस किंवा 72 तास आधी कोविड निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिजे)

गोवा सरकारने कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सवरील निर्बंध शिथिल केले आहेत. 50 टक्के उपस्थितीने कॅसिनो तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उपरोल्लिखित आस्थापने उद्या सोमवारपासून खुली होतील. जलसफरी करणार्‍या बोटी, वॉटर पार्क निम्म्या उपस्थितीने खुले करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण खात्याच्या स्वतंत्र एसओपीने विद्यालयेही कालांतराने खुली केली जाणार आहेत.
महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी हा आदेश काढला. कॅसिनो तसेच स्पा, मसाज पार्लरांवर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना किंवा प्रवेश करण्याच्या 72 तास आधी कोविड निगेटिव्हचा आरटीपीसीआर दाखला घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल. दुसरा डोस किमान 15 दिवस आधी घेतलेला असावा. मास्क परिधान करणे, सॅनिटायझिंग, थर्मल स्क्रीनिंग तसेच कोविडची इतर मार्गदर्शक तत्त्वें पाळणे सक्तीचे आहे.आँडिटोरियम, कम्युनिटी हॉल, सिनेमागृहांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने बसविता येणार नाही.
मार्चमध्ये कोविडची दुसरी लाट आल्यापासून गेले सहा महिने कॅसिनो, मसाज पार्लर, स्पा, बंदच होते. दरम्यान, काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. केरळमधून येणार्‍या प्रवाशांना (विद्यार्थी तसेच कर्मचारी वगळता) आरटीपीसीआर निगेटिव्ह दाखला सक्तीचा असून 5 दिवस घरी विलगीकरणात राहणेही सक्तीचे आहे.
टीटीएजीकडून स्वागत : पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणार्‍या टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आँफ गोवा (टीटीएजी) संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की,‘ कॅसिनो, जलसफरी करणार्‍या बोटी, मसाज पार्लर आदी चालू करण्याची गरज होती. कॅसिनोंमध्ये येणार्‍या ग्राहकांमुळे शहरातील दुकानांना तसेच हॉटेलना व टॅक्सी व्यावसायिकांनाही लाभ होतो.
पर्यटनावर निर्बंधांमुळे हॉटेलांमधील आँक्युपन्सी कमीच होती. दोन आणि तीन तारांकित हॉटेलांमध्ये 20 टक्केही खोल्या भरलेल्या नसत. केवळ विकेंडला काय ते पर्यटक येत असत. आता सरकारने निर्बंध शिथिल केल्यास हॉटेल आँक्युपन्सी 50 टक्क्यांच्याही वर जाईल. शहा म्हणाले की,‘ सध्या दाबोळी विमानतळावर दिवसाकाठी 55 ते 60 विमानफेर्‍या होतात. निर्बंध काढल्यानंतर आणखी 15 ते 20 विमानफेर्‍या वाढतील. काही महिन्यांनी हे प्रमाण दिवशी 90 ते 100 पर्यंत पोहचू शकते. महामारी येण्याआधी रोज 80 विमाने गोव्यात यायची. दरम्यान, सरकारने वाढवलेले पर्यटन शुल्क तसेच अबकारी करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी संघटनेने सरकार दरबारी केली आहे.  

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गोव्यात अखेर पर्यटन खुले;
कॅसिनो 50 टक्के क्षमतेने उघडणार, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सबरील निर्बंधही शिथिल (लसीचे दोन्ही डोस किंवा 72 तास आधी कोविड निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिजे)

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm