Corona Vaccine : बापरे! भाजपा नेत्याला देण्यात आले कोरोना लसीचे 5 डोस; सहावा डोसही शेड्यूल, हैराण करणारं प्रकरण

Corona Vaccine : बापरे! भाजपा नेत्याला देण्यात आले कोरोना लसीचे 5 डोस;
सहावा डोसही शेड्यूल, हैराण करणारं प्रकरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशात सध्या कोरोना लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाच्या एका नेत्याला एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा कोरोना डोस देण्यात आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कोरोना लसीचे पाच डोस दिलेले असले तरी आता सहावा डोस शेड्यूल असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सरधाना भागात ही हैराण करणारी घटना घडली आहे.
लसीकरणाच्या प्रमाणपत्रातून हे समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय रामपाल सिंह हे बूथ क्रमांक 79 चे भाजपा अध्यक्ष आहेत आणि हिंदू युवा वाहिनीचे सदस्य आहेत. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यावर त्यात त्यांना लसीचे पाच डोस देण्यात आल्याचं लिहिलं आहे. रामपाल सिंह यांनी आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीनंतर या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 
रामपाल सिंह कोरोना लसीचा पहिला डोस 16 मार्च रोजी आणि दुसरा 8 मे 2021 रोजी घेतला होता. मात्र जेव्हा त्यांनी अधिकृत पोर्टलवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड केले, तेव्हा त्यामध्ये लसीचे पाच डोस पूर्ण झाले असून सहावा डोस डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान शेड्यूल असल्याचे दिसून आलं आहे. प्रमाणपत्रावर पहिला डोस 16 मार्च आणि दुसरा डोस 8 मे रोजी दाखवतंय. तर, तिसरा डोस 15 मे आणि चौथा-पाचवा डोस 15 सप्टेंबरला घेतल्याचं दिसतं आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी अखिलेश मोहन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, लसीसाठी कोणाकडून दोनपेक्षा जास्त वेळा नोंदणी झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
प्रथमदर्शनी हा गैरप्रकार आणि षड्यंत्र वाटत आहे. काही लोकांनी पोर्टल हॅक करून हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे. जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले असल्यातची माहिती अखिलेश मोहन यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना तपासणी केंद्रावर मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात किट अडकल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अर्ध्या तासात महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Corona Vaccine : बापरे! भाजपा नेत्याला देण्यात आले कोरोना लसीचे 5 डोस; सहावा डोसही शेड्यूल, हैराण करणारं प्रकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm