बाप रे ! गुजरातमध्ये 9 हजार कोटीची हेरोईन जप्त, जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी उघड, अफगाण कनेक्शन

बाप रे ! गुजरातमध्ये 9 हजार कोटीची हेरोईन जप्त, जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी उघड, अफगाण कनेक्शन

belgavkar.com | belgaum | belgavkar

एक बातमी गुजरातमधून आलीय. आणि ही बातमी तिथल्या सत्ता बदलानंतरच्या परिणामांची नाहीय. तर ही बातमी आहे आतापर्यंतच्या फक्त जगातल्या सर्वात मोठ्या तस्करीच्या जप्तीची. एक नाही दोन नाही तर तब्बल 9 हजार कोटी रुपयांची हेरोईन जप्त करण्यात आलंय. कच्छच्या मुंद्रा बंदरावर डीआरआयनं (DRI-Directorate of Revenue Intelligence) झडती घेतली त्यात ही हेरोईन सापडलीय. आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय तर काही अफगाण नागरीकांचाही शोध घेतला जातोय, ज्यांचं ह्या जप्त केलेल्या हेरोईनशी संबंध आहे.
हेरोईनचा सुगावा कसा लागला..? आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्यात आशी ट्रेडींग नावाची कंपनी आहे. ह्या कंपनीनं अफगाणिस्तानमधून काही बाबी इम्पोर्ट केल्याची टीप डीआरआयला लागली. त्यातही यात ड्रग्ज असल्याचं टीप देणाऱ्यानं सांगितलं होतं. त्याच टीपच्या आधारावर मुंद्रा बंदरात आलेल्या दोन कंटेनरची झडती अधिकाऱ्यांनी घेतली. अधिकाऱ्यांना कंटेनरमध्ये ड्रग्जसारखी पावडर मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, ती पावडर टॅलकम पावडर असल्याचं सांगितलं गेलं. घटनास्थळावर गांधीनगरचे फॉरेन्सिक एक्स्पर्ट हजर होते. त्यांनी ती पावडर तपासली आणि त्यात हेरोईन असल्याची खात्री केली.
अगदी तंतोतंत सांगायचं तर पहिल्या कंटेनरमध्ये 1999.58 किलो ग्राम हेरोईन होती तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 988.64 किलो ग्राम म्हणजेच 2 हजार 988.22 किलो ग्राम एवढी हेरोईन जप्त करण्यात आलीय. हे कंटेनर अफगाणिस्तानमधून जरी आले असले तरीसुद्धा ते इराणच्या बंदर अब्बास पोर्टमधून आलेले आहेत.
हेरोईन सापडली पुढे काय? गुजरातमध्ये डीआरआयला जी हेरोईन सापडलीय ती जवळपास 9 हजार कोटी रुपये किंमतीची असल्याची माहिती पुढं आलीय. ह्या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी इथं छापे टाकून चौकशी केली जातेय. आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलीय आणि काही अफगाण नागरीकांचा शोध सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार ही जगातली आतापर्यंतची जप्त केलेली सर्वात मोठी हेरोईनची खेप आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बाप रे ! गुजरातमध्ये 9 हजार कोटीची हेरोईन जप्त, जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी उघड, अफगाण कनेक्शन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm