belgaum-tanaji-galli-marathi-board-removed-belgaum-202109.jpg | बेळगाव : तुमच्या प्रेमाची पापं भोगा..? गल्लीतील मंडळांचे दोन्ही बोर्ड पाडले | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : तुमच्या प्रेमाची पापं भोगा..? गल्लीतील मंडळांचे दोन्ही बोर्ड पाडले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हे होते तानाजी गल्ली येथील दोन फलक. एक त्या जेष्ठ पंचमंडळींचा होता ज्यांनी आजपर्यंत सर्व गल्लीच्या सुखाच्या आणि दुःखाच्या वेळी आधार देत पालखी असो वा तिरडी सर्व कार्यात सहभाग घेतला. आणि दुसरा फलक हा भगवा रक्षक युवक मंडळाचा. अरे भगवा रक्षक नाव काढून टाकायला हात तरी कसे धजवतात. हाच आहे भगव्याच्या सन्मान आणि हीच आहे जेष्ठांना मिळणारी वागणूक.
मराठी - भगवा यांची कावीळ झाली की काय...? तुम्ही विसरतं चाललायं की ज्या झाडाची मधुर फळे ते खात आहेत त्याच झाडाच्या मुळावर ते स्वतः घाव घालत आहेत. ते म्हणतात ना कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असे म्हटले जाते. यात काळ म्हणजेच मृत्यू किंवा नाश, आणि गोत म्हणजेच गणगोत (आपण ज्या परिवारातून, समाजातून येतो ते).. हे तेच आहेत जे तुमचं अस्तित्व नष्ट करण्याचं कारस्थान रचत आहेत.