बेळगाव : शाहूनगरात भरदिवसा चोरी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : शहराबाहेरील शाहूनगर येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशेजारी भरदिवसा धाडसी चोरीचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. यामध्ये चोरट्यांनी पाच तोळे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 2.75 लाखांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. चोरीच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे आणूर (ता. कागल) येथील शशिकांत ईश्वरा तोडकर हे पत्नी व मुलांसोबत शनिवारी सकाळी आपल्या मूळ गावी आणूर येथे गेले होते. रात्री आठच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. तोडकर यांचे कौलारू घर आहे. चोरट्यांनी घराच्यावरील कौले काढून आतमध्ये प्रवेश करून तिजोरी फोडली. त्यामध्ये असलेले सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याचे तोडकर यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी अडीच तोळ्याचे गंठण, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, सव्वा तोळ्याची सोनसाखळी व रोख रक्कम असा 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे दिसून आले. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : शाहूनगरात भरदिवसा चोरी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm