बेळगाव : ₹ 28 लाखांचा गुटखा पकडला; तिघांवर गुन्हा

बेळगाव : ₹ 28 लाखांचा गुटखा पकडला;
तिघांवर गुन्हा

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक (ता. अथणी, जि. बेळगाव) येथून सांगोला (जि. सोलापूर) मार्गे पुण्याकडे जात असताना पोलीस अधिकारी व अन्न भेसळ व औषध  प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी  सुमारे 10 लाखांची दोन वाहने पकडून सुमारे ₹ 28 लाख 37 हजार 360 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडून जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान सांगोला - महुद रोड वरील शिवणे व एखतपूर पाटी येथे करण्यात आली. पोलीस व अन्नभेसळ प्रशासन अधिकाऱ्यांनी एकाच रात्री एकाच रोडवर दोन ठिकाणी प्रतिबंधक गुटखा पकडल्याने चोरून गुटखा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक राजगुरू, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस नाईक कोरे पोलीस नाईक देवकते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मेटकरी यांनी सांगोला महुद रोड पेट्रोलिंग करताना शिवणे गावाजवळ (एम एच-12 एलटी-4328) पिकअपमधून पुण्याकडे जाणारा 15 लाख 13 हजार 120 रुपयांचा गुटखा पकडला.
अन्न व भेसळ प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रदिप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.वाय. इलागोर व अन्न सुरक्षा अधिकारी उ.सु. भुसे रोडवर एखतपूर पाटीजवळ (एम एच-12-एस एक्स-1240) अशोक लेलँड या टेम्पोतून 13 लाख 24 हजार 240 रुपयांचा गुटखा असा सुमारे 28 लाख 37 हजार 360 रुपयाचा गुटखा पकडला. या कारवाईत पोलिसांनी प्रवीण दत्तात्रय खांडेकर व  चेतन दत्तात्रय खांडेकर तसेच बाबू धुळा काळे (खैरणे ता. जत जि. सांगली) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ₹ 28 लाखांचा गुटखा पकडला; तिघांवर गुन्हा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm