belgaum-ganapati-visarjan-immersion-kannada-board-laxmi-nipanikar-202109.jpg | बेळगाव : म्हणाले I Don't Care; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : म्हणाले I Don't Care;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेजबाबदार वक्‍तव्य

बेळगाव : श्री गणेश विसर्जनप्रसंगी कपिलेश्वर तलावावर फक्त कन्नड भाषेत महापालिकेनं बॅनर लावला होता. गेल्या कित्येक वर्षापासून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा फलक मराठी व कन्नड भाषेत असायचा, मात्र यंदा पहिल्यांदाच हा फलक फक्त कन्नड भाषेमध्ये असल्यामुळे एका गल्लीच्या श्रीमूर्ती विसर्जनावेळी संतप्त मराठी भाषिकांनी महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांना घेराव घालून जाब विचारल्यांची घटना काल रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी घेतली. मराठी भाषेत गणेश भक्तांनी घेराव घालून जाब विचारताच भडकलेल्या निप्पाणीकर यांनी नजरचुकीने कन्नडमध्ये फलक लावला गेला असावा असे सांगितले.
त्यानंतर मराठी भाषेतील नामफलकासंदर्भात महापालिका आयुक्तांनी I Don't Care अशी उद्धट प्रतिक्रिया व्यक्त करत मराठी भाषेची आपल्याला कदर नसल्याचे दाखवून दिल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी 'आय डोन्ट केअर' (म्हणजेच मला काही फरक पडत नाही) अशा शब्दात उद्धट प्रतिक्रिया व्यक्त केली. या पद्धतीने मराठी भाषेची आपल्याला कदर नाही हे मनपा आयुक्त आणि दाखवून दिल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन फलक इतर भाषेत का लावला नाही? असा सवाल महानगरपालिकेच्या अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांच्यासमोर उपस्थित केला. नजरचुकीने असे झाले असून यापुढे होणार नाही, असे त्यांनी सांगितले; मात्र काही कार्यकर्त्यांनी उद्धट उत्तर दिल्यामुळे त्या संतापल्या होत्या. आणि त्यांनी थेट एसीपींना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. एसीपी एन. व्ही. बरमनी व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पागवण्याचा प्रयत्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात शेवटचे विसर्जन आज सकाळी 6 वाजेपर्यंत झाले. बेळगाव महापालिकेचा गणपती सकाळी सहा वाजता विसर्जन होताच गणेश उत्सवाची सांगता झाली. रात्रभर अनेक ठिकाणी तुरळक लाठी हल्ला झाला होता.